शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

‘आशा’ना दिवाळीआधी ५00 रूपयांची भेट

By admin | Published: March 11, 2015 11:10 PM

संदेश सावंत : सिंधुदुर्गातील सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कारांचे वितरण

सिंधुदुर्गनगरी : आरोग्य विभागाच्या सर्व योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य आशा स्वयंसेविका करतात. या आशा स्वयंसेविकांना जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करून प्रत्येकी ५०० रुपये दिवाळी भेट दिवाळीच्या अगोदर देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत सन २०१३-१४ सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक व आशा आणि नाविन्यपूर्ण सखी योजना पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, महिला व बालविकास सभापती स्नेहलता चोरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व्यवस्थापक संतोष सावंत तसेच तालुका आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यावेळी उपस्थित होते.जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत म्हणाले की, आशा स्वयंसेविका गावस्तरावर आरोग्य विभागाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांच्या या कामाचा गौरव करण्याचा हा छोटासा सोहळा नक्कीच आशा स्वयंसेविकांना बळ देणारा ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, आशा स्वयंसेविका करत असलेले काम हे मोठे काम आहे. गावपातळीपर्यंत शासनाच्या आरोग्याच्या योजना आशा पोहोचवित असतात आणि त्यांच्या कामामध्ये असाच उत्साह कायम राहावा, यासाठी शासनाकडून कौतुकाची थाप पडणे आवश्यक आहे आणि हा सोहळा आशा स्वयंसेविकांना पुढील वाटचालीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी सभापती स्नेहलता चोरगे, सदस्य प्रमोद कामत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यानी मनोगत व्यक्त केले, तर आशांमधून नेहा गवस, अर्चना धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे समन्वयक संतोष सावंत यांनी शेवटी आभार मानले. यावेळी आशा स्वयंसेविकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)प्राथमिक आरोग्यकेंद्रनिहाय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकाप्राथमिक आरोग्यकेंद्रनिहाय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांमध्ये सविता कदम (वैभववाडी), शाफिना बोबडे (उंबर्डे), दीपिका शेट्ये (खारेपाटण), सुविधा तळेकर (कासार्डे), अमिता पेंडूरकर (कनेडी), मेघना लाड (फोंडा), मेघना घाडीगावकर (कळसुली), सिमरन तांबे (नांदगाव), प्राची पवार (वरवडे), स्नेहल कोठावळे (पडेल), जयश्री अनभवणे (मोंड), हेमलता कोर्लेकर (फणसगांव), किरण कोकम (मिठबाव), जान्हवी पाटील (इळये), माधुरी किंजवडेकर (शिरगाव), प्रीती कदम (आचरा), नाझिया शेख (मसुरे), अक्षता गोसावी (चौके), लीना तळगावकर (गोळवण), रिना सावंत (हिवाळे), रोशनी खंदारे (कडावल), शीतल चव्हाण (कसाल), यास्मिन शेख (पणदूर), रागिणी गोसावी (हिर्लोक), राजलक्ष्मी सावंत (माणगाव), माधवी तेंडोलकर (वालावल), राजलक्ष्मी परुळेकर (परुळे), सुरुची दाभोळकर (आडेली), सुवर्णा रेडेकर (रेडी), अक्षता साळगांवकर (तुळस), अश्विनी रेगे (मळेवाड), प्रियांका राऊळ (सांगेली), मेधा परब (निरवडे), दीक्षा देसाई (आंबोली), मनीषा देसाई (बांदा), रविना नाईक (साटेली भेडशी), शर्मिला गावस (मोरगाव), शीतल सावंत (तळकट) आदींचा समावेश आहे. या आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिकवितरण  .तालुकास्तर सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकासर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पारितोषिकासाठी सुश्मिता कांबळे (उंबर्डे), यास्मिन साटविलकर (नांदगांव), सुश्मिता परब (मोंड), अर्चना धुरी (मसुरे), अर्चना नाईक (माणगाव), प्रीती राऊळ (आडेली), राजश्री नाईक (आंबोली), विजया देसाई (साटेली भेडशी) यांची निवड करण्यात आली आहे. द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी समीक्षा जठार (वैभववाडी), मनिषा जाधव (फोंडा), विषया दळवी (शिरगांव), समीक्षा लाड (हिवाळे), सायली राणे (पणदूर), प्रतीक्षा रेडकर (रेडी), गायत्री काडरकर (सांगेली), भाग्यश्री बागकर (मोरगाव) यांना पारितोषिके वितरण सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तकजिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक म्हणून वैष्णवी ठाकूर (कनेडी), विशाखा लाड (कळसुली), पल्लवी नाचणकर (मसुरे), सोनल मोर्ये (तुळस), अर्चना रेगे (मळेवाड), नेहा गवस (साटेली भेडशी) यांना जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक म्हणून प्रत्येकी ३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय सवोत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून ८ हजार रुपये पारितोषिक असलेल्या प्रथम क्रमांकासाठी प्रज्ञा धोपटे (इळये), तर ६ हजार रुपये पारितोषिक असलेल्या द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी स्नेहल साटम (शिरगाव) यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.