सिंधुुदुर्गनगरी : डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गंत ५ कोटी ५० लाख रूपयांच्या आराखड्याला डोंगरी विकास समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर होते.या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष रणजित देसाई, समितीचे अशासकीय सदस्य गणेशप्रसाद गवस, प्रमोद रावराणे, पुष्पलता नेरूरकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, तसेच शासकीय खातेप्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये डोंगरी विभाग विकास अंतर्गत तालुकावार सर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यानंतर सीआरझेड संदर्भातही सर्व संबंधितांची बैठक झाली. यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या ४७ हरकतींच्या प्रकरणी संबंधीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन अहवाल द्यावा. मॅगरू क्षेत्र तसेच बफर झोनबाबत पुन्हा परिसराची पाहणी करून अहवाल द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना केल्या.(प्रतिनिधी)केसरकर : एक किमीची कामे सुचवावीतडोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत दोडामार्ग तालुक्याचा लवकरच समावेश होेणार असून, याबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल. यावेळी दीपक केसरकर म्हणाले की, यामुळे डोंगरी विकासाचा जिल्ह्याचा निधी वाढण्यास मदत होणार आहे. ३०० मीटर, ५०० मीटर अशी लहान स्वरूपात रस्त्याची कामे करू नयेत. याबाबत किमान एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे यापुढे प्रस्तावित करावीत. याबाबतही सुधारीत शासन निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. शंभर टक्के निधी खर्ची पडणारसन २०१३-१४ ची कामे, इतर विभागीय सन २०१४-१५ व २०१५-१६ मधील कामे ३१ मार्च २०१६ पूर्वी पूर्ण क रून १०० टक्के निधी खर्च होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना केसरकर यांनी यावेळी दिल्या.
५.५० कोटींचा आराखडा मंजूर
By admin | Published: January 08, 2016 12:07 AM