मिलिंद पारकर - कणकवली -राज्यात उत्पादित होणाऱ्या कोकम फळापैकी बहुतांश कोकमचे उत्पादन रत्नागिरी, सिंधुदुर्गात होत आहे. मात्र, उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत येणाऱ्या अडचणींमुळे व्यापारी तत्त्वावरील लागवडीपासून कोकम दूरच आहे. उत्पादनापैकी फक्त ४० टक्के कोकम प्रक्रिया आदी माध्यमातून वापरात येत असून उर्वरित उत्पादन फुकट जात असल्याचे चित्र आहे. कोकम (गारसेनिया इंडिका) या प्रजातीचे उत्पादन राज्यभरात सुमारे १२,५०० मेट्रिक टन एवढे होते. त्यापैकी जवळपास ९३ टक्के उत्पादन रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत होते. म्हणजे सुमारे १० हजार मेट्रिक टन कोकम फळाचे उत्पादन फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात होते. सिंधुदुर्गात घराघरात कोकम फळापासून आमसुले, कोकम सरबत, कोकम घोल, आगुळ आदी उत्पादने घरगुती प्रक्रियेद्वारे केली जातात. कोकम किंवा रतांब्याची झाडांची लागवड ही व्यापारी तत्त्वावर केल्याचे आढळत नाही. जंगलात वाढणाऱ्या किंवा परसदारी लावलेल्या झाडांची फळे काढली जातात. काजू, आंबा फळांना जसे थेट मार्केट उपलब्ध आहे तसे कोकम फळांना नाही. कोकम फळावर प्रक्रिया किंवा अर्धप्रक्रिया करून बाजारपेठ मिळवावी लागते. त्यामुळे लागवड करण्यात शेतकरी उदासीन आहेत. असलेल्या झाडांवरून फळे मिळवून काही प्रमाणात प्रक्रिया केली जात आहे. मात्र, कोकम लागवडीपासून मार्केटींगपर्यंत सुनियोजीत साखळी निर्माण न झाल्याने एकंदर कोकम उद्योग ऊर्जितावस्थेला आलेला दिसत नाही.कोकम फळापासून कोकम घोल, आमसुले, कोकम सरबत, कोकम आगळ, बियांपासून मुठियाल या पारंपरिक उत्पादनांबरोबर रेडी टू सर्व्ह ड्रिंक, कार्बोनेटेड कोकम सरबत, हायड्रॉक्सिसायट्रिक अॅसिड, कोकम एक्स्ट्रॅक्ट, कॉसंट्रेट आदी व्यापारी उत्पादनेही घेतली जातात. त्यामुळे या पिकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.कोकमच्या झाडांची लागवड झाल्यानंतर १५-२० वर्षानंतर फलधारणा होते. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यास उदासीन वातावरण आहे. कोकम झाडांना फलधारणा पावसाळ्याच्या तोंडावर होणे ही मोठी समस्या आहे. पावसात होणारी फळ धारणा आणि उंच झाडांची फळे गोळा करणे अडचणीचे ठरते. पावसामुळे फळांचे नुकसान होते. गार्सेनिया इंडिका प्रजाती लुप्त होण्याची भीती---------------------------द४ं१‘ढ१ी२२ (३े)---------------------------उंल्लह्ण३ ६१्र३ी ३ङ्म ्िर२‘. [-61]---------------------------डङ ---------------------------सिंधुदुर्गात आतापर्यंत कोकम प्रक्रिया उद्योगाला बळकटी देण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झालेले नाहीत. काही उद्योजकांकडून अर्धप्रक्रिया केलेले कोकम मॅप्रो, योजकसारख्या कंपन्यांकडून घेतले जाते. कोकम सरबत टेट्रापॅकमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला. आता जिल्ह्यातील कोकमवर प्रक्रिया करणाऱ्या ४० उद्योजकांच्या सहभागातून कोकम क्लस्टर करण्यात आले आहे. लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यातून हा सुमारे १५ कोटींचा प्रकल्प साकारण्यात येत आहे.- डॉ. आनंद तेंडूलकर,कणकवली
६0 टक्के कोकम वाया,,उत्पादन फुकट
By admin | Published: August 31, 2014 9:52 PM