सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ६१ दुर्धर आजारी रुग्णांना आठ लाख ४६ हजार रुपयांचे धनादेश बुधवारी वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांनी दिली.जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत २८ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १८६ दुर्धर आजारी रुग्णांना देण्यात आला. या योजनेत प्रतिलाभार्थी जास्तीत जास्त १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येते. त्यासाठी लाभार्थ्यांकडून १५ हजारपर्यंतची औषधोपचाराची बिले सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देऊन या योजनेचा लाभ दिला जातो. कॅन्सर, हृदयरोग, किडणी अशा आजाराने पीडित रुग्णांना मदत देण्याची या योजनेत तरतूद आहे. त्यानुसार आतापर्यंत १८६ लाभार्थ्यांना २५ लाख ८१ हजार ३३४ एवढ्या रकमेची मदत देण्यात आली आहे.यामध्ये बुधवारी मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावातील ६१ लाभार्थ्यांना आठ लाख ४६ हजार ६५ रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये कणकवली तालुक्यातील ११ लाभार्थ्यांना एक लाख ९० हजार ११४ रुपये, वैभववाडी - एक लाभार्थी १५ हजार, वेंगुर्ला - चार लाभार्थी ५९ हजार ४३० रुपये, देवगड - चार लाभार्थी ६० हजार, मालवण - नऊ लाभार्थी एक लाख १८ हजार ७०३ रुपये, कुडाळ- १४ लाभार्थी एक लाख ८८ हजार ४०१ रुपये, दोडामार्ग- चार लाभार्थ्यांना ५० हजार ७६९ रुपये, तर सावंतवाडी तालुक्यातील ११ लाभार्थ्यांना एक लाख ६३ हजार ६४८ रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आल्याची माहिती डॉ. आठले यांनी दिली. (प्रतिनिधी)१८६ रुग्णांना २५ लाखांची मदतसिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदत करता यावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत योजना राबवून त्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून जिल्ह्यातील १८६ दुर्धर आजारी रुग्णांना आतापर्यंत आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करून २५ लाख ८१ हजार ३३४ एवढा निधी खर्च केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांनी दिली.
६१ दुर्धर आजारी रुग्णांना मदत
By admin | Published: May 14, 2015 9:40 PM