शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कणकवलीत सरासरी ६५ टक्के मतदान

By admin | Published: February 21, 2017 11:40 PM

६४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : किरकोळ बाचाबाची वगळता अनुचित प्रकार नाही

कणकवली : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठीच्या २१ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठीच्या ४३ अशा ६४ उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले. रविवारी वरवडे येथे घडलेली मारहाणीची घटना तसेच दारिस्ते येथील किरकोळ बाचाबाचीच्या घटनेव्यतिरिक्त तालुक्यात शांततेत सुमारे सरासरी ६५ टक्के मतदान झाले.कणकवली तालुक्यात १२६ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान झाले. सकाळी ७.३0 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९.३0 वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ११.५२ टक्के मतदान झाले होते. तर कासार्डे मतदान केंद्रावर या कालावधीत सर्वाधिक म्हणजे २४ टक्के मतदान झाले होते.सकाळी ११.३0 वाजेपर्यंत २८.७८ टक्के , दुपारी १.३0 वाजेपर्यंत ४६. ६४ टक्के, दुपारी ३.३0 वाजेपर्यंत ५६.६९ टक्के मतदान झाले होते. दिवसभर झालेल्या मतदानाचा ओघ पहाता सायंकाळी ५.३0 वाजता मतदानाचा कालावधी संपेपर्यंत सरासरी सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील ठिकठिकाणांच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे पुन्हा कणकवली महाविद्यालयाच्या एच. पी. सी. एल. सभागृहातील स्ट्रॉन्ग रूममध्ये जमा करण्याच्या प्रक्रियेमुळे शेवटची मतदानाची नेमकी आकडेवारी समजू शकली नाही. निवडणूक निरीक्षक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार गणेश महाडिक, शिरस्तेदार पी.बी. पळसुले, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा आदी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेट दिली. तसेच हे अधिकारी मतदान प्रक्रियेवर दिवसभर लक्ष ठेवून होते.अनेक गावातील वृध्द तसेच अपंग व्यक्तिंनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ११.३0 ते १.३0 या कालावधीत भर उन्हातही मतदारांनी मतदान केले. या कालावधीत अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी जास्त होती. राजकीय पक्षांनी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. तर ठिकठिकाणी लावलेल्या बुथवरही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. (प्रतिनिधी)बंडखोर बाजी मारणार काय?तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातून काँग्रेसच्या संदेश सावंत- पटेल यांनी बंडखोरी केली आहे. तर पंचायत समितीच्या लोरे मतदार संघातून काँग्रेसच्या राजेश रावराणे व तळेरे मतदार संघातून जयप्रकाश जाधव , भाजपच्या संजय नकाशे यांनी कासार्डे व तन्वी मोदी यांनी फोंडा मतदार संघातून तर शिवसेनेच्या विश्वनाथ आचरेकर यांनी कलमठ मतदार संघातून बंडखोरी केली आहे. बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातील भाजपच्या सुनील तांबे यांनाही आपला अर्ज मागे घेता आलेला नाही. शिवसेनेच्या विश्वनाथ आचरेकर यांनी विनायक मेस्त्री यांना तर सुनील तांबे यांनी भाजपच्या विजय तांबे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित बंडखोर या निवडणुकीत बाजी मारणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.