ठळक मुद्देसुरक्षित केलेली ६५ पिल्ले समुद्राच्या पाण्यात सोडली.
वेंगुर्ला : शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले कासव जातीच्या सुमारे ६५ पिल्लांना सोमवारी समुद्री अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले. शिरोडा-किनाºयावर आॅलिव्ह रिडले कासव अंडी घालून जातात. ही अंडी निदर्शनास आल्यावर शिरोडा ग्रामपंचायत सदस्य गुणाजी उर्फ आजू अमरे, कासवमित्र आबा चिपकर हे ती संरक्षित करून ठेवतात.
या किना-यावर त्यांनी संरक्षित केलेल्या अंड्यापैकी सोमवारी ६५ पिल्ले अंड्यातून बाहेर आली. तत्काळ या कासव मित्रांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व कांदळवन प्रकल्प समन्वयक अमित रोकडे यांच्या उपस्थितीत आजू अमरे व कासव मित्र आबा चिपकर यांनी सुरक्षित केलेली ६५ पिल्ले समुद्राच्या पाण्यात सोडली.