शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
3
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
4
भाजपाने केला करेक्ट कार्यक्रम? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
6
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
7
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
8
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
9
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
10
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
12
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
13
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
14
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
15
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
16
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
17
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
18
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
19
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
20
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?

जिल्ह्यात ७०% मतदान

By admin | Published: February 21, 2017 11:25 PM

४८५ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद : किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात मतदान झाले. गतवेळच्या (२०१२) निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले होते. या मतदानाच्या टक्केवारीची आकडेवारी ब्रेक करीत यावेळी सरासरी तब्बल ७० टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. मतदानादिवशी काही किरकोळ घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तीन मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांत बिघाड झाल्याने त्याठिकाणी तत्काळ नवीन यंत्रे कार्यान्वित करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १५० जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या ४८५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रांत बंद झाले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी मतमोजणीची उत्सुकता मात्र लागून राहिली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १५० जागांसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन तास मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. जिल्हा परिषदेच्या ५० व पंचायत समितीच्या १०० जागांसाठी जिल्ह्यात ८३८ मतदान केंद्रे स्थापन केली होती.जिल्ह्यात सकाळी ९.३० पर्यंत १२.२९ टक्के मतदान झाले. दुपारी ११.३० वाजेपर्यंत २८.३६ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४५.२७ टक्के, तर ३.३० पर्यंत ५७.०४ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ दिसून येत होती. युवा मतदारांसह ज्येष्ठ मतदारांची संख्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. काही किरकोळ घटना वगळता बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांना भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. (प्रतिनिधी)तीन मशीनमध्ये बिघाड जिल्ह्यातील ८३८ मतदान केंद्रांपैकी तीन मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रांत बिघाड झाला. कास, आरोसबाग व कसाल येथील मतदान केंद्रांतील मशीन बंद झाल्याने ती बदलण्यात आली, तर वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर येथील मतदान केंद्रातील मशीनमध्ये काहीवेळ तांत्रिक बिघाड झाला होता, तो तज्ज्ञांमार्फत दूर करण्यात आला. कुडाळात लक्षवेधी लढतीजिल्ह्यातील बहुतांशी चुरशीच्या लढती कुडाळमधून होत आहेत. यामध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भारिप, रिपाइं, बसप आदी पक्षांचे प्रमुख पदाधिकारी रिंगणात उतरले आहेत. सर्वाधिक लक्षवेधी लढती कुडाळ तालुक्यात होत असल्याने याठिकाणी झालेल्या मतदानावर बहुतांशी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.यादीतून मतदारांची नावेच गायबकुडाळ तालुक्यातील निळेली, गोठोससह काही गावांतील मतदार यादीत ठराविक मतदारांची नावेच यादीतून गायब होती. असाच प्रकार जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये होता. त्यामुळे मतदारांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकाराने काहीकाळ गोंधळ उडाला.