लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : भात कापणीचा हंगाम असतानाही मतदान केंद्रांवर सकाळी असलेली गर्दी... प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्याची उमेदवारांची उत्सुकता... काही ठिकाणी झालेले किरकोळ वादविवाद, तर काही ठिकाणी मतदान यंत्रात झालेला बिघाड... अशा वातावरणात सोमवारी जिल्ह्यातील ३२५ पैकी २९६ ग्रामपंचायतींसाठी शांततेत सरासरी ७२ टक्के मतदान झाले. सरपंच पदाच्या ८३७ आणि सदस्य पदाच्या ३५२५ अशा एकूण ४३६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवडीला जाणार असल्याने सर्वच गावांत तेथील उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून प्रत्येक मतदारांची मनधरणी करून मतदानासाठी प्रवृत्त केले जात होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ पैकी २९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने सोमवारी प्रत्यक्षात २९६ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया झाली. यातील ४६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आणि ९२६ सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे २७९ सरपंच आणि १७३५ सदस्य पदांच्या जागेसाठी सोमवारी ९२५ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया पार पडली. गेले दोन दिवस पडणाºया पावसाने सोमवारी सकाळच्या सत्रात उसंत घेतल्याने आणि सायंकाळच्या सत्रात भात कापणीला जाता येईल या उद्देशाने मतदारांनी सकाळच्या सत्रातच मतदान केंद्रावर आपली हजेरी लावली होती. त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. मतदान यंत्रात बिघाडजिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सुरळीतपणे मतदान पक्रिया सुरू असताना वैभववाडी तालुक्यातील करुळ, देवगड तालुक्यातील चांदोशी आणि सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा मतदान केंद्रावरील मतदान केंद्रात बिघाड झाल्याने त्या ठिकाणी मतदारांना काही काळ थांबावे लागले. काही वेळानंतर ती मतदान यंत्रे बदलून देण्यात आली. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतरित्या सुरु झाली. त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यातील नेर्ले येथील मतदान यंत्रात बिघाड झाला होता. मात्र तेच यंत्र दुरुस्त करून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.सकाळी ११.३0 वाजेपर्यंत ३४ टक्के, दुपारी १.३0 वाजेपर्यंत ५0.२४ टक्के मतदान झाले होते. दुपारी ३.३0 वाजेपर्यंत ६२.२७ टक्के एवढे मतदान झाले होते. सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत सुमारे ७२ टक्के एवढे मतदान झाले आहे.मतदानासाठीगेलेल्या वृद्धेचा मृत्यूदेवगड तालुक्यातील किंजवडे येथील सुलोचना सुर्वे (वय ७६) ही वृद्ध महिला आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर आल्या असता त्यांच्यावर काळाने झडप घातली. मतदान केंद्रावर जात असताना सकाळी ९.३0 वाजण्याच्या सुमारास चक्कर येऊन कोसळल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.निकाल दुपारपर्यंतसरपंचपदासाठी रिंगणात असलेल्या ८३७ आणि सदस्य पदासाठी रिंगणात असलेल्या ३५२५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. ही निवडणूक दुरंगी असल्याने त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत जनतेमधून तर्क-वितर्क लढविले जात असले तरी आज, मंगळवारी होणाºया मतमोजणी आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेआहे.
सिंधुदुर्गात ७२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:12 AM