शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

लांजात ७५ टक्के मतदान

By admin | Published: January 19, 2015 12:00 AM

मतमोजणी आज : ९ हजार ३९७ मतदारांनी बजावला हक्क

लांजा : सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या लांजा नगरपंचायतीसाठी आज, रविवारी मतदान शांततेत पार पडले. एकूण १२ हजार ४०६ मतदारांपैकी ९ हजार ३९७ मतदारांनी आपला हक्क बजावल्याने ७५.७५ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे. उद्या, सोमवारी होणाऱ्या मतमोजणीमध्ये मतदारराजाने विजयाची माळ कोणत्या पक्षाच्या गळ्यात घातली आहे, हे चित्र स्पष्ट होणार आहे.लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या चारही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्याने अनेक ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे व ज्येष्ठ नेते राजन देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव आणि प्रदेश सरचिटणीस महमंद रखांगी, शिवसेनेचे आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार उदय सामंत, मालवणचे आमदार वैभव नाईक, तर भाजपने प्रदेश प्रवक्ते बाळ माने, संजय यादवराव, आदींनी या निवडणुकीत सहभाग घेतल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. आज, रविवारी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदान सकाळी साडेसात वाजता धिम्यागतीने सुरू झाले. साडेनऊ वाजता १७ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या पुढच्या दोन तासांत ३७ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी जमा झाली होती. या कालावधीत ६८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. त्यानंतर ३.३० ते ५.३०पर्यंत उर्वरित मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी प्रत्येक उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मोठा प्रयत्न केल्याने अखेर ७५.७५ टक्के मतदान झाले. एकूण १२ हजार ४०६ मतदारांपैकी ९ हजार ३९७ मतदारांनी मतदान केले. यामध्ये एकूण पुरुष ४ हजार ८२५, तर एकूण ४ हजार ५७२ महिलांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. लांजा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वांत जास्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व प्रभागांत माजी खासदार नीलेश राणे, शिवसेनेचे राजन साळवी, गणपत कदम, अजित यशवंतराव, महमंद रखांगी, संजय यादवराव यांनी भेटी दिल्या.