शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

७६ ग्रामपंचायतीची होणार पोटनिवडणूक

By admin | Published: July 20, 2016 11:15 PM

१०२ जागा रिक्त : आॅगस्टच्या सुरूवातीस निवडणुकीची शक्यता

सिंधुदुर्गनगरी : ७६ ग्रामपंचायतींमधील १०२ सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. यासाठीची प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी २५ जुलैला जाहीर होणार आहे. त्यामुळे जुलै अखेरीस किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात या ७६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.जून २०१६ पर्यंत ७६ ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या ९५ प्रभागमधील १०२ जागा रिक्त झाल्या आहेत. यासाठी पोटनिवडणुकांची कार्यवाही निवडणूक प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून, १२ जुलैपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. हरकती आल्या असतील, तर त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी २५ जुलैला प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे जुलैच्या अखेरीस किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात या ७६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तविली आहे.ज्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत, त्यांचा तपशील असा : देवगड तालुक्यातील आरे, कुवळे, तोरसोळे, पाटगाव, बुरंबावडे, मोंडपार, शिरवली, फणसे, पावणाई, चाफेड, चांदोशी, कट्टा, वाघोटण, पाटथर, गोवळ, पुरळ, विजयदुर्ग, ओंबळ. कणकवली तालुका-करंजे, कोंडये, माईण, पिसेकामते, सावडाव, वायंगणी, कुरंगवणे, फोंडाघाट, कोळोशी, साकेडी, शिवडाव, कुंभवडे, सातरल. मालवण-आमडोस, आंबेरी, कातवड, किर्लोस, खोटले, घुमडे, चौके, पोईप, बंदिवडे बुद्रुक, बांदिवडे खुर्द, वायंगवडे, हडी, महाण, साळेल, तोंडवली. वैभववाडी तालुका-अरूळे, आखवणे-भोम, गडमठ, मौदे, कुसुर. कुडाळ तालुका-पडवे, पोखरण-कुसबे, रानबांबुळी, कुंदे-वर्दे, पावशी, ओरोस बुद्रुुक. वेंगुर्ले तालुका-आसोली, अणसूर, केळूस, वायंगणी, पालकरवाडी, पाल. सावंतवाडी-तांबोळी, गेळे, शिरशिंगे. दोडामार्ग-केर भेकुर्ली, मोर्ले, कुडासे खुर्द, परमे पणतुर्ली, खोकरल, विर्डी, भुकेरी, बोडण, माटणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)२५ जुलै : अंतिम यादी७६ ग्रामपंचायतीसाठीची प्रारूप मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली असून अंतिम मतदार यादी २५ जुलैला जाहीर होणार आहे.