शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोकणात ८० टक्के आंबा लागवडीखालील क्षेत्र - प्रकाश शिनगारे 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 22, 2024 6:31 PM

रोटरी क्लब मँगो सिटीतर्फे देवगडात आंबा चर्चासत्र

अयोध्याप्रसाद गावकरदेवगड : देशात २५ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवडीखाली असून त्यामध्ये कोकणात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. राज्यातील आंबा लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोकणात आंबा लागवडीसाठी व्यापले आहे. मागील काही वर्षात आंबा उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे बदलते हवामान आहे. मोठ्या प्रमाणात वाढते तापमान, बदललेला पाऊस पडण्याचा हंगाम आणि वर्षभर पडणारा पाऊस थंडीच्या प्रमाणात होणारे चढ-उतार यामुळे आंबा हंगाम लांबणीवर जात आहे. त्यातच आंबा पिकावर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने फळमाशीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षांपासून खूपच वाढला आहे. फळमाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्षक सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात माशीला आकर्षित करण्यासाठी जे औषध आहे ते बागायतदारांनी दर्जेदार घेतले पाहिजे. सर्व बागायतदारांनी दर्जेदार औषध सापळ्यात ठेवले तर फळमाशीवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केले.रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे आंबा बागायतदारांसाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेंद्र पतंगे (सहयोगी अधिष्ठाता काढणी पश्चात व्यवस्थापन महाविद्यालय रोहा), डॉ. केतन चौधरी (विस्तार शिक्षण विभाग प्रमुख), डॉ. सुरेश नाईक, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रवीण पोकळे, सचिव विजय डांबरी, विजय बांदिवडेकर, नरेश डामरी, तालुका कृषी अधिकारी प्रदीप खाडे आदी उपस्थित होते.डॉ. एस. बी. स्वामी यांनी ‘आंबा काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच देवगड तालुक्यातील आंबा बागायतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केतन चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी घारे यांनी केले.

एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचेडॉ. शिनगारे म्हणाले की, थ्रीप्सवर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे थ्रीपचे जीवनशैलीत बदल झाला आहे. प्रतिकारशक्ती वाढली आहे, त्यामुळे थ्रीप्समध्ये वाढ होताना दिसत आहे. विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुरू आहे. आंबा उत्पादन जास्तीत जास्त होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, यातूनच आंबा उत्पादन चांगले होईल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAgriculture Sectorशेती क्षेत्रMangoआंबा