रत्नागिरी : दापोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. नंदलाल शिंदे यांनी केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा या ऐच्छिक हिंदी संस्थेमधून बी.एड्.ची पदवी घेतलेली आहे.अलाहाबाद विद्यापीठातून बी.एड्. पदवी घेतलेल्या ५१ शिक्षकांपैकी २६ शिक्षकांना त्यांच्या मूळ जागेवर म्हणजेच उपशिक्षक पदावर पदावनत करण्याची कारवाई शिक्षण विभागाने नुकतीच केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केलेल्या या कारवाईने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय हिंदी संस्थान आग्राची बी.एड्. पदवीही वादात अडकणार हे निश्चित होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीने अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीप्रमाणे केंद्रीय हिंदी संस्थान आग्राच्या बी.एड्. पदवीची तपासणी केली होती. त्यामध्ये विस्तार अधिकारी शिंदे यांच्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. नंदलाल शिंदे यांनी केंद्रीय हिंदी संस्थानमधून घेतलेल्या बी.एड्. पदवीची कागदपत्रे समितीसमोर सादर केली. शिंदे यांनी हिंदी राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेच्या राष्ट्रभाषा पंडित या पदवीनंतर १९९९ मध्ये केंद्रीय हिंदी संस्थानमधून बी.एड्.ची पदवी घेतली आहे. या दोन्ही पदव्या पदोन्नतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी मान्यताप्राप्त नाहीत, असा १४ जून १९९९ चा शासन निर्णय आहे. शिंदे यांनी पुन्हा २००४ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधरांवर केलेल्या कारवाईनंतर जिल्हा परिषदेकडून शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शिक्षकांमध्ये संशयाचे वातावरण होते. अखेर शिंदे यांच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. आग्राच्या बी.एड्. पदवीची तपासणी केली होती. त्यामध्ये विस्तार अधिकारी शिंदे यांच्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. नंदलाल शिंदे यांनी केंद्रीय हिंदी संस्थानमधून घेतलेल्या बी.एड्. पदवीची कागदपत्रे समितीसमोर सादर केली. शिंदे यांनी हिंदी राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेच्या राष्ट्रभाषा पंडित या पदवीनंतर १९९९ मध्ये केंद्रीय हिंदी संस्थानमधून बी.एड्.ची पदवी घेतली आहे. या दोन्ही पदव्या पदोन्नतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी मान्यताप्राप्त नाहीत, असा १४ जून १९९९ चा शासन निर्णय आहे. शिंदे यांनी पुन्हा २००४ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली आहे. अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीधरांवर केलेल्या कारवाईनंतर जिल्हा परिषदेकडून शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शिक्षकांमध्ये संशयाचे वातावरण होते. अखेर शिंदे यांच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. (शहर वार्ताहर)
एटीएममध्ये ८१ लाखांचा अपहार
By admin | Published: September 06, 2015 9:46 PM