मेहरून नाकाडे - रत्नागिरी राज्यातील एकूण ८९४५ फिडर्सपैकी ७५६४ फिडर्स आतापर्यंत भारनियमनमुक्त करण्यात आले आहेत. एकूण ८५ टक्के फिडर्स भारनियमनमुक्त झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १३९, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८३ फिडर्स आहेत. कोकण झोनमधील २२२ फिडर्स २०१२ पासून भारनियमनमुक्त झाले आहेत.जून २००६मध्ये शून्य भारनियमनाचे पुणे मॉडेल मांडण्यात आले. तद्नंतर २००८मध्ये महावितरणच्या जिल्हा मुख्यालयात रात्री १० वाजेपर्यंत असलेले भारनियमन कमी करून सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू करण्यात आले. वर्षभरात अर्थात् जानेवारी २००९मध्ये नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नवी मुंबई येथील सर्व महसुली मुख्यालये भारनियमनमुक्त झाली. राज्याच्या स्थापनेपासून असलेली औद्योगिक वसाहतीतील १६ तासांची सुटी फेब्रुवारी २०१२पासून रद्द करण्यात आली व उद्योगांना आठवड्याचे सात दिवस २४ तास वीजपुरवठा सुरू करण्यात आला. महावितरण कंपनीने २४ एप्रिल २०१२ पासून अ, ब, क गटातील भारनियमन बंद केले. यात राज्यातील १४२ विभागांपैकी ९४ विभाग म्हणजेच ६६ टक्के भाग भारनियमनमुक्त करण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होता. दि. १ आॅक्टोबर २०१२ पासून ड गटातील भारनियमन बंद करण्यात आले. नियमित पैसे भरणाऱ्या ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी जानेवारी २०१३पासून विभागनिहाय भारनियमन बंद करून ‘फिडरनिहाय’ भारनियमन सुरू करण्यात आले. त्यासाठी अ, ब, क वर्गवारी करण्यात आली. ज्या फिडरवर वीजहानी कमी व वसुलीचे प्रमाण चांगले असेल, तेथील भारनियमन रद्द करण्यात आले. त्यामुळे राज्यातील १३४ विभागात होणारे भारनियमन बंद करून फिडरप्रमाणे भारनियमन सुरू करण्यात आले. त्यामुळे राज्यातील ७५६४ फिडर्स भारनियमनमुक्त झाले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२२ फिडर्सचा समावेश आहे.दि. १९ जून २०१४ रोजी कृषी वाहिन्यांवरील हानीच्या मोजमापांचे निकष बदलण्यात आले. ४५ टक्क्यांपेक्षा कमी हानी व इतर वाहिन्यांवर ४२ टक्क्यांपेक्षा कमी हानी असलेल्या संबंधित वाहिन्यांवरील गावे, वस्त्या भारनियमनमुक्त करण्यात आल्या आहेत. २०१२ पासून आजपर्यंत भारनियमनमुक्तचा आलेख वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान, कोकण पूर्णपणे भारनियमनमुक्त झाल्याने कोकणवासियांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.भारनियमनमुक्त फिडर्सची संख्या महिनाफिडर्सची संख्याजाने. १२१०६४फेब्रु. १२२०६४एप्रिल १२४९६५आॅक्टो. १२५९२२मार्च. १३६३३९नोव्हें. १३६८२३जाने. १४७१६१आॅगस्ट १४७२६५आॅक्टो. १४७५८०नोव्हें. १४ ७५८०डिसें. १४७५६४
राज्यातील ८५ टक्के फिडर्स भारनियमनमुक्त
By admin | Published: June 17, 2015 10:15 PM