शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

कणकवलीत कचरा व्यवस्थापन, प्रक्रियेसाठी ९०० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 6:25 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईलया प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिन ए. जी. डॉटर्स या कंपनीला देण्यात येणार आहे. शून्य कचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणारा हा प्रकल्प होण्यासाठी ९०० कोटीची गुंतवणूक या  कंपनीकडून करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी येथे केली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शून्य टक्के प्रदूषण असलेले या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईल. देशातील तिसरा अन महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प या निमित्ताने कणकवलीत होत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली नगरपंचायत सभागृहात ए. जी. डॉटर्स कंपनीकडून कचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतर प्रक्रीयेचा प्रस्ताव नगरपंचायतकडे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सादर केला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अ‍ॅड. विराज भोसले, अबिद नाईक, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, किशोर राणे, कविता राणे, उर्मी जाधव आदी नगरसेवक उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकाराने आम्ही कणकवलीत आणत आहोत. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा प्रकल्प २४ तास सुरु राहील. याठिकाणी २५ वर्षे कामकाज सुरु राहणार आहे. पुढील आठ महिन्यात प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७५ ते १०० मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी पाईपलाईनचा गॅस निर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. कचरा व्यवस्थापनातून विकासाचा राजमार्ग !सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात आजचा हा दिवस ऐतिहासीक नोंद करणारा आहे. जिल्ह्यातील कचºयाचा प्रश्न कणकवली नगरपंचायतच्या पुढाकारामुळे मार्गी लागत आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणुन सातत्याने दोन वर्षे सिंधुुदुर्गाचा सन्मान झाला आहे. ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शून्य कचरा व्यवस्थापनातून पुढील २५ वर्षे जिल्हा देशात अव्वल राहील. कणकवलीचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हाती घेतलेले हे शिवधनुष्य लवकरच यशस्वी होईल. या प्रकल्पातुन कचºयाच्या माध्यमातून एक विकासाचा राजमार्ग उभा राहतो, हे आमच्या विरोधकांना दिसेल.असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी  सांगितले. 

कणकवली नगरपंचायत येथे शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतराचा प्रस्ताव ए. जी. डॉटर्स कंपनीचे चेअरमन अजय गिरोत्रा यांनी सादर केला . यावेळी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (अनिकेत उचले)

 

Attachments area

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानGovernmentसरकार