सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ हजार ७२१ लाभार्थ्यांना व्यवसायांसाठी ९९ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक के. बी. जाधव यांनी दिली.यावर्षी म्हणजे सन २०१६-१७ मध्ये २६ सप्टेंबर २०१६ अखेर जिल्ह्यातील ३ हजार ६१९ लाभार्थ्यांना ३२ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. छोटे व्यावसायिक, दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते, मशिन आॅपरेटर्स, अन्न प्रक्रीया, दुरुस्ती व्यावसायिक, कारागीर, ट्रान्सपोर्ट, वाहनचालक आदींचा या मुद्रा योजनेत समावेश आहे. एकूण तीन गटात अर्थसहाय्य दिले जाते. शिशु योजना ५० हजार रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी, किशोर योजना ५० हजार ते ५ लक्ष रुपये कर्जासाठी तर तरुण योजना ५ लक्ष रुपये व १० लक्ष रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी, मुद्रा योजनेंतर्गत १० हजार रुपये खेळते भांडवल देण्याचीही योजना आहे. (प्रतिनिधी)
मुद्रा योजनेअंतर्गत ९९ कोटी कर्जवाटप
By admin | Published: September 28, 2016 10:53 PM