सावंतवाडी : रेल्वेच्या धडकेत सावंतवाडीतील प्रसिद्ध ढोलकीवादक बंड्या ऊर्फ बाबाजी पांडूरंग निव्हेलकर (वय-59) याचा मृत्यू झाला. कोकण रेल्वेच्या मळगाव स्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात ही घटना घडली.सावंतवाडी मळगाव येथील रेल्वेस्थानकात निव्हेलकर हे काहींना मंगळवारी दुपारी दिसले होते. त्यानंतर त्याचा त्या दिवशीच रात्री उशिरा रेल्वे रूळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. रेल्वेला धडकल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला असून निव्हेलकर यांना धडक बसली कि त्यानी रेल्वे खाली उडी मारली हे मात्र कळू शकले नाही. बड्या निव्हेलकर यांचा उत्कृष्ट तबला वादक तसेच ढोलकीवादक म्हणून नावलौकिक होता. भजन ही त्यांची आवड होती. ते स्वत: भजनात गायन करत असत. त्यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीनंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. निव्हेलकर याच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
सावंतवाडीतील प्रसिद्ध ढोलकीवादकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
By अनंत खं.जाधव | Published: May 02, 2024 12:57 PM