सिंधुदुर्ग : रागाच्या भरात सख्ख्या पुतण्याच्या पोटात चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी सुभाष श्रीधर माधव (रा. पाेईप मालवण) याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी तीन वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.आरोपी सुभाष श्रीधर माधव यांनी २० मे २०१७ रोजी आपल्या सख्ख्या पुतण्याच्या पोटात रागाच्या भरात चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केला होता. रागाच्या भरात आरोपीने हा गुन्हा केलेला होता. या गुन्ह्यात सरकारतर्फे महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले होते. रागाच्या भरात गुन्हा घडल्याचे पुराव्यात दिसून आल्याने आरोपीविरुद्ध कलम ३२६ अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयाने आरोपी सुभाष याला भादंवि कलम ३२६ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी संपूर्ण केस चालवली व युक्तिवादही केला होता. या केसच्या सुनावणीवेळी साक्षीदारांना उपस्थित ठेवण्याकरिता पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक जयराम पाटील वगैरे टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.