शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

दोडामार्ग तालुक्यात चार दिवसांत दुसर्‍यांदा आढळले दुर्मिळ खवलेमांजर

By अनंत खं.जाधव | Published: September 02, 2022 11:54 AM

सर्वात जास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाने खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे.

सावंतवाडी : दोडामार्ग मधील पिकुळे लाडाचेटेंब येथे कृष्णा काशीराम महालकर यांना मध्यरात्री त्याच्या बागेत दुर्मिळ असे खवले मांजर आढळून आले. गेल्या चार दिवसांत दुसर्‍यांदा दोडामार्ग तालुक्यात खवले मांजर आढळून आले. वनविभागाला ही माहिती कळताच त्यांनी गावात जाऊन खवलेमांजराला ताब्यात घेत त्यांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले.दोडामार्ग तालुक्यात सध्या मोठ्याप्रमाणात दुर्मिळ खवल्या मांजराचे दर्शन होत आहे. चार दिवसापूर्वी उघाडे येथे खवलेमांजर आढळले होते. यानंतर आता पिकुळे येथेही कृष्णा काशीराम महालकर यांना मध्यरात्रीच्या सुमारास बागेत खवलेमांजर निदर्शनास आले. त्यांनी कुत्रे व इतर नैसर्गिक शिकारी यांचेपासून खवलेमांजराचे संरक्षण करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत खवलेमांजर ताब्यात घेवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.जगात सर्वात जास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभाग दोडामार्ग येथील वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे. या अंतर्गत  तालुक्यातील शेतकरी व नागरीक बांधवांना या दुर्मिळ खवलेमांजराच्या संवर्धन व संरक्षणाकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कामगिरीमध्ये वनक्षेत्रपाल दोडामार्ग कार्यालयाचे वनपाल माणेरी संग्राम जितकर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, वनमजुर विश्राम कुबल, संतोष शेटकर आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग