मालवण : शहरातील चिवला बिच येथील समुद्रकिनारी बुधवारी रात्री आढळून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पीठ गोळे सदृश्य पदार्धामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. यावेळी बीडीएस पथकाचे प्रभारी फारणे यांनी नार्कोटिक्स, एक्सप्लोसिव्ह अनुषंगाने तपासणी केली असता त्यात संशयास्पद असे काही आढळून आले नाही.शहरातील चिवला बीच येथे समुद्रकिनारी आज रात्री पांढऱ्या मातकट रंगांचे चिकट पीठ गोळे सदृश्य पदार्थ स्थानिकांना दिसून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस हवालदार सुभाष शिवगण, कैलास ढोले, महादेव घागरे, अजय येरम, सुशांत पवार घटनास्थळी दाखल झाले. समुद्रकिनारी आढळलेल्या पदार्थाची पाहणी करून तात्काळ जिल्ह्याचे बीडीएस तसेच फॉरेन्सिक पथक यांना पाचारण करण्यात आले.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणारसमुद्रकिनारी आढळून आलेला माल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. संबंधित पदार्थ पुढील तपासणीसाठी न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.