शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

वेंगुर्ला द्वीपसमूहात स्विफ्टलेफ्टची मोठी विण वसाहत; सॅकॉनचे शास्त्रज्ञ सादर करणार संवर्धन आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 6:46 PM

जगभरात इंडीयन स्विफ्टलेट पक्षाच्या १३ विण वसाहती आहेत.

संदीप बोडवे

मालवण: वेंगुर्ला द्वीप समूहातील बर्न्ड आयलँड बेटावरील गुहेत असलेल्या भारतीय पाकोळी (इंडीयन स्विफ्टलेट) या पक्षाच्या जगातील सर्वात मोठ्या विण वसाहतीचे संवर्धन करण्यासाठी सॅकॉनचे शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहेत. त्यांनी याबाबतचा संवर्धन आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून लवकरच हा आरखडा भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे. सॅकॉनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गोल्डिन क्वार्ड्रोज, डॉ. शिरीष मंचि यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक धनुषा कावलकर या एका प्रकल्पाअंतर्गत २०२० पासून महाराष्ट्रातील भारतीय पाकोळी पक्षांच्या वसाहतींचे संशोधन करत आहेत. 

जगातील सर्वात मोठी वसाहत...जगभरात इंडीयन स्विफ्टलेट पक्षाच्या १३ विण वसाहती आहेत. त्या पैकी भारतात तामिळनाडू, केरला व महाराष्ट्रात या पक्षांच्या ६ वसाहती असून वेंगुर्ले दीप समूहातील बर्न्ड आयलँड या बेटावर भारतीय पाकोळी ची जगातील सर्वात मोठी विण वसाहत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. भारता व्यतिरिक्त श्रीलंकेत या प्रजातीची वसाहत आढळते.

गुहेत पाच ते सहा हजार पक्षांचे वास्तव्य... बर्न्ड आयलँड बेटावरील गुहेत पाच ते सहा हजार पक्षी वास्तव्य करून आहेत. या गुहेची लांबी ६१ मिटर व उंची १८ मिटर असून भारतीय पाकोळीच्या वसाहतीने ही गुहा भरली आहे. तिची अधिकचे पक्षी वास्तव्य सामावण्याची क्षमता संपली आहे. या मुळे येथीलच ओल्ड लाईट हाऊस या बेटावर भारतीय पाकोळी पक्षाने आपली दुसरी वसाहत तयार केली आहे. 

वैशिष्ट्य पूर्ण पक्षी...भारतीय पाकोळी एक पत्नी व्रत असतात. त्यांचे पाय कमजोर असल्याने त्यांना एपोडेडी म्हणतात. ते कधीही जमिनीवर उतरत नाहीत. त्यांचे पंजे मजबूत असल्याने ते लटकू शकतात. हवेतल्या हवेत तरंगत असल्याने त्यांना एरोडायनामिक पक्षी म्हणून ओळखतात. अमेरिकेतील ऑईल बर्ड या एकमेव पक्षाप्रमाणे अंधारात प्रवास करून आपले मूळ स्थान शोधण्याची त्यांना कला अवगत आहे. 

लाळे पासून घरटे.....भारतीय पाकोळी पक्षी आपली घरटी त्यांच्या लाळे पासून बनवितात. १० ग्राम वजनाचा पक्षी १० ग्राम लाळ उत्सर्जित करून आपले घरटे बनवितात. याला ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागतो. हवेत उडणारे कीटक हे त्यांचे खाद्य आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग