शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

अबब.. साडेसात फूट उंचीची टोमॅटो बाग!

By admin | Published: February 07, 2016 10:10 PM

पळशी शिवार : संभाजी पिसाळ यांच्या कष्टाला फळं; ऊस उत्पादनाकडे कधीच न वळण्याचा निर्धार

असाध्य ते साध्य होईल तयास’ या उक्तीचे अनुकरण करीत वडिलार्जित २० गुंठे क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची बळावर कोरेगाव तालुक्यातील पळशी येथील शेतकरी संभाजी आबाजी पिसाळ यांनी या क्षेत्रात अलंकार या जातीच्या टोमॅटोची लागवड केली. बागेची उत्तम जोपासना केल्याने बागेतील टोमॅटोची उंची साडेसात फूट आहे. कोरेगाव-वाठार रस्त्याकडेला असलेली ही बाग सर्वांच्याच नजरेत बसत आहे. पळशी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटंबात जन्मलेल्या संभाजी पिसाळ यांनी घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे नववीपर्यंतच शिक्षण घेतले. शिक्षण कमी असल्याने नोकरीच्या वाटाही बंद झाल्या होत्या. शेवटी वडिलार्जित शेती करणे हाच त्यांच्या समोरचा मार्ग होता. घरची शेती ही तशी अत्यल्पच असल्याने या शेतीत त्यांनी झोकून घेतले. १९९५ पासून त्यांनी या शेतात टोमॅटोचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. काळानुरूप शेती व्यवस्थेतील आधुनिकतेचा त्यांनीही स्वीकार करत शेती व्यवसायात बदल घडवला. या बागेतून त्यांनी १७ टन टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे. या माध्यमातून त्यांना २ लाख ७५ हजारांचे उत्पन मिळाले आहे. तर बागेसाठी आजपर्यंत १ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. हा खर्च वजा करता त्यांना आत्तापर्यंत ८० ते ९० हजारांचा निव्वळ फायदा झाला आहे. अजून किमान २२ ते २५ टन टोमॅटोचे उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. हा अंदाज पाहता २० गुंठे टोमॅटो बागेतून त्यांना खर्च वजा जाता अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न या बागेतून मिळणार आहे. --संजय कदम मल्चिंग पेपरचा वापर२४ आॅगस्ट २०१५ रोजी त्यांनी अलंकार नावाच्या टोमॅटोची लागवड केली. लागवड करताना त्यांनी मल्चिंग पेपरचा व ठिबक सिंचनचा वापर केला. यामुळे या रोपांची वाढ चांगली होण्याबरोबरच पाण्याची मोठी बचत झाली. शिवाय तण व बुरशीजन्य रोगापासून रोपांचा बचाव झाला. अधून-मधून शेण खताबरोबरच, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर या बागेसाठी केला. यामुळे बागेची उंची सात ते साडेसात फुटांपर्यंत वाढली. उंची वाढण्याबरोबरच टोमॅटोचे उत्पादनही वाढले आहे.शेतकऱ्यास हमखास फायदा मिळवायचा असेल तर टोमॅटोसारखे दुसरे कोणतेच पीक फायदेशीर नाही. ऊस पिकाबाबत मला विश्वास वाटत नाही. सध्या उसाचे पीक संकटात आहे. कारखानदाऱ्यांंची, तोडकऱ्यांची मनधरणी करण्यातच शेतकरी खचून जात असल्याने उसाचे पीक मी कधीच घेत नाही, आणि घेणार नाही. यावर्षी मी या टोमॅटो बागेबाबत अभ्यासपूर्वक नियोजन केले होते. - संभाजी पिसाळ