कणकवली : सिंधुदुर्गात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात झाले आहे. पहिल्या दिवसापासूनच गणरायाच्या आरतीचे स्वर घराघरांत घुमत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवालाही भाविकांची गर्दी होत आहे. गणेशोत्सवातील कार्यक्रमांचा आनंद जिल्ह्यातील भाविक विविध मनोरंजनांतून लुटत आहेत. भक्तिभावाने गणरायाचे पूजन, आरती आणि भजनात सर्वचजण सहभागी होत आहेत. सिंधुदुर्गात घरोघरी श्री गणरायाच्या सेवेत भक्त मग्न झाले आहेत. सायंकाळनंतर घरोघरी गणरायाच्या आरतीचे स्वर निनादत आहेत. जिल्ह्यातील भजन मंडळांकडून भजनांनी रात्री जागवल्या जात आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठांत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. आबालवृद्धांसहित तरुण, महिलावर्गाची सार्वजनिक गणेशोत्सवाला गर्दी होत आहे. चाकरमान्यांचे गणेशोत्सवाला आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सामाजिक ऐक्यासाठी लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला गणेशोत्सव कोकणात अभूतपूर्व उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी एस. टी. बसस्थानकांवर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहेत. गणेशोत्सवानिमित्त भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. भाजी खरेदीकडे ग्राहकवर्ग वळला आहे. फळांना, फुलांना, मिठाईला मागणी वाढली आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. आबालवृद्धांसहित तरुण, महिलावर्गाची सार्वजनिक गणेशोत्सवाला गर्दी होत आहे. गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांचा सर्वांत मोठा उत्सव. या उत्सवात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच उत्साहाने सहभागी होतात आणि बाप्पाच्या उत्सवाचा आनंद लुटतात. भक्तिमय वातावरणात दररोज आरती, भजन, पूजन करतात. यामुळे कोकणात सध्या सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. (प्रतिनिधी) महामार्गावर वर्दळ वाढली गणेशोत्सव म्हटला की, कोकणातील चाकरमानी अगोदरच गणेशोत्सवाला येण्याचे तिकीट बुकिंग करून ठेवतात. सर्वांत मोठा उत्सव असल्याने तसेच कोकणातील जास्तीत जास्त लोक मुंबईत काही कामानिमित्त रहात असल्याने कोकणातील गणेशोत्सवाला मुंबईकर चाकरमान्यांची महामार्गावर, तसेच रेल्वेमार्गावरही वर्दळ वाढली आहे. महामार्गावरील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, नांदगाव, खारेपाटण, तळेरे, आचरा रोडवर गणेशोत्सव कालावधीत ‘ट्रॅफिक जाम’ही होते. या उत्सवासाठी प्रशासनानेही चोख नियोजन केले आहे.
जिल्ह्यात घुमताहेत आरतीचे स्वर
By admin | Published: September 11, 2016 9:44 PM