तळेरे : ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आणि अनेक ठिकाणी समर्थ विकास पॅनेलने जोरदार मुसंडी मारली. तळेरे येथील समर्थ विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदेवता श्री गांगेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. तळेरे ग्रामपंचायत निवडणुकीत समर्थ विकास पॅनेलने मतदानापूर्वीच आघाडी घेत विजयाचा चौकार मारला आहे.
यावेळी उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, चंद्रकांत तळेकर, विश्वजित तळेकर, शशांक तळेकर, अरूण भांबुरे, विलास महाडिक, प्रकाश साटम, सदानंद घाडी, विजय तळेकर, भाऊ सुर्वे, प्रकाश घाडी, प्रदीप घाडी, बबन केसरकर, मनोज तळेकर, उदय सुर्वे, विजय पेडणेकर, विष्णू भोगले, चंद्रकांत चव्हाण, संतोष तळेकर, प्रफुल्ल बांदिवडेकर, अनिल तळेकर, आप्पा मेस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी असलेल्या उपस्थितीवरून समर्थ विकास पॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याठिकाणी सरपंच पदाची लढत तिरंगी होत आहे. या प्रचार शुभारंभानंतर तळेरे गावठण येथून घरोघरी प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
दमदार मुसंडीतळेरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समर्थ विकास पॅनेलने विजयाचा चौकार मारला आहे. प्रभाग १ मधून स्वप्नील वनकर, संगीता खानविलकर तर प्रभाग ३ मधून सुषमा बांदिवडेकर व दिनेश मुद्रस हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे मतदानापूर्वीच या पॅनेलने जोरदार मुसंडी मारली आहे.
एकहाती सत्ता आणण्याचा निर्धारयाशिवाय प्रभाग १ मधून रुपाली भांबुरे, प्रभाग २ मधून संदीप घाडी, दीपक नांदलसकर तर प्रभाग ३ मधून कोमल तळेकर निवडणूक लढवित आहेत. तर याच पॅनेलकडून सरपंचपदासाठी साक्षी सुर्वे निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना निवडणुकीत निवडून आणून एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.