शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

दाखलपात्र मुलांपेक्षा जास्त प्रवेश

By admin | Published: October 25, 2015 10:51 PM

रत्नागिरी जिल्हा : सहा तालुक्यात अधिक वाढ

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात १४०३४ मुलांनी प्रवेश घेतल्याचे पटसंख्या निश्चितीनंतर स्पष्ट झाले आहे. दाखलपात्र मुलांपेक्षा सुमारे १५०० अधिक मुलांनी प्रवेश घेतला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होऊ लागल्याने त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आज शेकडो शाळांची संख्या १० ते २०पेक्षा कमी असल्याने या शाळांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पटसंख्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते.मागील शैक्षणिक वर्षामध्ये जिल्ह्यात इयत्ता पहिलीसाठी दाखलपात्र मुले किती आहेत, याची पाहणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी घरोघरी फिरुन केली होती. त्यामध्ये १२५३९ मुले दाखलपात्र असल्याची नोंद झाली होती. यामध्ये ६४९३ मुलगे आणि ६०४६ मुलींचा समावेश होता. या मुलांना चालू शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांच्या पालकांचे प्रबोधन करण्यात आले होते. चालू शैक्षणिक वर्ष सन २०१५-१६ च्या सप्टेंबरअखेर प्राथमिक शाळांची पटसंख्या निश्चित करण्यात आली. त्यामध्ये १४०३६ मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये ७१२८ मुलगे आणि ६९०८ मुलींचा समावेश आहे. चालू शैक्षणिक वर्षात दाखलपात्र मुलांपेक्षा प्रत्यक्ष दाखल झालेल्या मुलांची संख्या जास्त असली तरी ही वाढ सहा तालुक्यांत झालेली दिसून येत आहे. तर मंडणगड, रत्नागिरी आणि लांजा या तीन तालुक्यांमध्ये दाखलपात्र मुलांएवढीच मुले शाळेत दाखल झालेली आहेत. (शहर वार्ताहर)मोफत शिक्षण : पटसंख्या वाढीचे जोरदार प्रयत्नजिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागामध्ये वाडी-वस्त्यांमध्ये जाऊन अगदी डोंगराळ भागातही दाखलपात्र मुलांचे सर्वेक्षण केले होते. हे सर्वेक्षण करताना शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली होती. तरीही या दाखलपात्र मुलांसाठी शिक्षकांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता. हे सर्वेक्षण शहरी भागातही करण्यात आले होते.जिल्हा परिषदेच्या शाळांकडे ग्रामीण विद्यार्थ्यांनीही पाठ फिरवल्याची चर्चा एकीकडे सुरु असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दृष्टीने ही आनंददायी खबर आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पटसंख्या वाढल्याचे समाधानकारक चित्र या शैक्षणिक वर्षात दिसून आले.जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारला आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न चालवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून पटसंख्येत यंदा समाधानकारक वाढ झाली असल्याचे जिल्हा परिषदेतील एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तालुकादाखलपात्र दाखल मुलेझालेली मुलेमंडणगड ६०१ ६०१दापोली१४७३ १६९६खेड११७१ १३७४चिपळूण१५२० २०८३गुहागर११७० १२६६संगमेश्वर१६२५ १८०९रत्नागिरी२५९५ २५९५लांजा ९५३ ९५३राजापूर१४३१ १६५९एकूण -१२५३९१४०३६