कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे गोवा ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या एका कारला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावर उलटी होऊन चाके वर झाली होती. कारमधील चालकासह ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ६च्या सुमारास घडली.दरम्यान, अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी थांबलेल्या रुग्णवाहिका, दुचाकी आणि टेम्पोला दिलीप बिल्डकॉनच्या काँक्रीट मिक्सर वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिली. त्यामुळे त्या तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालकाचा ताबा सुटल्याने वागदे डंगळवाडी येथे कारला अपघात झाला. तेथील नागरिकांनी कळविल्यानंतर जखमींना नेण्यासाठी पिंट्या जाधव हे रुग्णवाहिका घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका थांबविलेल्या ठिकाणीच एक दुचाकी व टेम्पो होता.या तिन्ही गाड्यांना महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असलेल्या दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीच्या काँक्रीट मिक्सर वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. त्यामुळे तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी अनेक नागरिकांनी धाव घेतली.दरम्यान, जखमींना ओसरगाव माजी सरपंच बबली राणे व अन्य नागरिकांनी एका वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी वाहतूक पोलिसांसह कणकवली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम दाखल झाले होते.अपघातात चार जण जखमीवागदे येथील अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये कार चालक देवाशीष बनुमलीक खाडंगा (३६, रा. कांदिवली, मुंबई), तन्मय देवाशीष खाडंगा (८, रा. कांदिवली), स्वाती अशोक अगरवाल (३८) व सौरभ अशोक अगरवाल (३४, रा.कांदिवली, मुंबई) यांचा समावेश आहे.
वागदे डंगळवाडी येथे अपघात, कारसह अन्य तीन वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 10:57 AM
mumbai-goa highway, Accident, damage car मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे गोवा ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या एका कारला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यावर पलटी होऊन चाके वर झाली होती. कारमधील चालकासह ४ जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.
ठळक मुद्देवागदे डंगळवाडी येथे अपघात, कारसह अन्य तीन वाहनांचे नुकसान चार जखमी, पोलीसपथक दाखल