शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे अत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
3
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
4
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
5
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
6
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
7
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
8
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
9
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर
10
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
11
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
12
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
13
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
14
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
15
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
17
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
18
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
19
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
20
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू

‘गौण’च्या अटी-शर्ती नियमानुसारच

By admin | Published: March 14, 2016 10:36 PM

अनिल भंडारी : ग्राहकांची फसवणूक झाल्यास कारवाई करू

सिंधुदुर्गनगरी : वाळू किंवा गौण खनिजाचे दर शासन निश्चित करू शकत नाही. शासनाकडे हे दर निश्चित करणारी यंत्रणा नाही; मात्र यात ग्राहकांची फसवणूक होत असेल तर निश्चित हस्तक्षेप करू आणि संबंधितांवर कारवाई करू. गौण खनिज तसेच वाळू संदर्भात लावलेले निकष आणि अटी माझे नाहीत तर शासन निर्णयानुसारच आहेत, असेही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सोमवारी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.डंपर आंदोलनानंतर सोमवारी मुख्यालयात पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. १२ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसारच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमलबजावणी झाली. यात कोणतीही मनमानी नव्हती. या नव्या शासन निर्णयानुसार पाचपट दंडाची तरतूद आहे. एक ते पाच पंट दंड घ्यावा, असे या कायद्यात नमूद नाही. एस.एम.एस. व बार कोड ही पद्धतही राज्यभर आहे. बेकायदा वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती असून, त्यात आपणासह जिल्हा पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व खनिकर्म अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मी स्वत: महामार्गावर पहाटेच्यावेळी दहा मिनिटांत वाळूची बिगरपरवाना वाहतूक करणारे सात डंपर पकडले. जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जवळपास ७०० डंपरची नोंदणी झाली आहे. एक ब्रास क्षमतेच्या ट्रॅक्टरची नोंदणी नगण्य आहे. त्यामुळे एक ब्रासच पास देणे धोक्याचे असून, शासनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने दोन ब्रासचे परवाने वितरित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.गौण खनिजाच्या वाहतुकीबाबत दिवस-रात्र कोणत्याही वेळेत वाहतूक करण्यास मुभा आहे. त्यात कोणाची महसूल प्रशासनाने अडवणूक केलेली नाही; मात्र गौण खनिज उत्खननासाठी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्याचे बंधन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.दंडाची आकारणीही २२ फेब्रुवारीपासून कमी करण्यात आली. महसूल विभागाची राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. त्यात याबाबत दंडाची निश्चिती झाल्यानंतर दंडाची रक्कमही ६० हजार ८०० रुपये इतकी कमी करण्यात आली आणि हा दंडही डीएसआरनुसार होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘दोन दिवसांत निर्णय होणार’डंपर आंदोलकांवर लाठीमार केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गृहविभागाने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे, तर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याबाबतचा निर्णय सोमवारी (१४ मार्च) अपेक्षित होता. याप्रकरणी स्थापन चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, दोन दिवसांत तो जाहीर करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी त्यांची भेट घेतली होती. आदेशानुसार पोलिस यंत्रणा सहभागीपोलिस यंत्रणेला मिळालेले अधिकारही शासन आदेशाचाच एक भाग आहे. आमच्या समितीत सदस्य असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलिस यंत्रणा गौण खनिज वाहतुकीचे डंपर तपासत होते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.शल्यचिकित्सकांचा अवमान नाहीडंपर आंदोलनात अटक झालेले आमदार नीतेश राणे यांना जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन बिलोलीकर यांनी उपचारासाठी दाखल करून घेतले होते. डॉ. बिलोलीकर यांना यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर डॉ. बिलोलीकर अत्यवस्थ झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल झाले होते. मात्र, अशाप्रकारे आपण त्यांचा अवमान केला नसल्याचे अनिल भंडारी यांनी स्पष्ट केले.