शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

रेल्वेतील चोरीप्रकरणी आरोपीला अटक

By admin | Published: February 05, 2016 12:51 AM

आरोपी दार्जिलिंगचा : रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेची चिपळूणमध्ये कारवाई

रत्नागिरी : कोकण रेल्वेत एका महिन्यापूर्वी झालेल्या साडेबारा लाखांच्या चोरीप्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने एका आरोपीला चिपळूणमध्ये अटक केली आहे. या चोरट्याने दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा १२ लाख ५९ हजार ६०३ रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरली होती. ३ जानेवारी २०१६ रोजी ही घटना खेड तालुक्यातील आंजणी स्थानकावर घडली होती. विवेक ऊर्फ विकी यदू प्रधान (वय २३, कागे, जि. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. श्रीमती मैफिली बिपीन भेंडे (रा. ठाणे) ही महिला कोकण रेल्वेने प्रवास करीत होती. खेड तालुक्यातील आंजणी स्थानकावर त्यांच्या पर्सची चोरी झाली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीवरून पोलिसांचे पथक चिपळूणला पाठविण्यात आले होते. या पथकाने संशयित विवेक प्रधानला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत गुन्हा त्यानेच केल्याचे उघड झाले. त्याच्याकडे चोरीस गेलेल्या ऐवजातील २४ हजार किमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटक आरोपीला खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक मामा कदम, पोलीस कर्मचारी सुभाष माने, तानाजी मोरे, दिनेश आखाडे, राकेश बागूल, उदय वाजे, संदीप कोळंबेकर, प्रवीण बर्गे व रमीझ शेख यांनी सहभागी झाले होते.