सिंधुदुर्गनगरी : तत्कालिन बांधकाम सभापतींनी रस्ते दुरुस्ती, ग्रामीण भागातील पायवाटा करणे या हेड खाली समिती सदस्यांनी सुचविलेली २ कोटी १९ लाखाची कामे सुचविली होती. मात्र, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांनी ती नामंजूर केल्याची बाब सभागृहात उघड होताच सभागृहात वादंग निर्माण झाला. हा सर्व प्रकार योग्य नसून सभापतीचा अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोपही सदस्य सदा ओगले यांनी करत या सर्व प्रकारामुळे बांधकाम विभागामार्फत झालेल्या खर्चाची मान्यता फेटाळली.जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा सभापती संजय बोंबडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदा ओगले, एकनाथ नाडकर्णी, पंढरीनाथ राऊळ, आत्माराम पालयेकर, रुक्मिणी कांदळगावकर, भगवान फाटक, समिती सचिव तथा प्रभारी कार्यकारी अभियंता श्रीकांत मुन्नावली, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.बांधकाम समिती सदस्यांनी आपापल्या मतदारसंघात अपेक्षित असणारी ग्रामीण भागातील पायवाटा, रस्ते दुरुस्ती आदी कामे सुचवावीत असे तत्कालीन बांधकाम सभापती भगवान फाटक यांनी सांगितले होते. त्यानुसार २ कोटी १९ लाखांची कामे सूचवून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांमुळे दीपलक्ष्मी पडते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. मात्र, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांनी यातील एकही काम मंजूर केले नाही अशी धक्कादायक माहिती सभेत उघड होताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. सभापतींच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. समितीचे अधिकार डावलल्याचा राग मनात ठेवत गेल्या महिन्याभरात या विभागाकडून झालेल्या खर्चास समितीकडून मान्यता फेटाळण्यात आली. (प्रतिनिधी)कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यांना प्राधान्यग्रामीण भागातील रस्ता दुरुस्ती करण्यासाठी कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यांना प्राधान्य देण्यात आले आहे, असा आरोप आत्माराम पालयेकर यांनी करीत उर्वरित तालुक्यांनी करायचं काय? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला आहे. तर उर्वरित ८0 लाखाच्या निधीसाठी कणकवलीतून १५ तर मालवणातून २ अशा १७ कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेवर सीईओंचा वचक नाहीजिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या काही योजनांवर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा वचकच राहिला नसल्याचा आरोप सदस्य सदा ओगले यांनी केला.
सभापतींच्या अधिकारावर गदा आणल्याचा आरोप
By admin | Published: December 12, 2014 10:06 PM