शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

आरोपीची तलावात उडी; बुडून मृत्यू

By admin | Published: May 06, 2016 11:39 PM

सावंतवाडीतील घटनेने खळबळ : पलायनाचा प्रयत्न; झटापटीत दोन पोलिस अत्यवस्थ

सावंतवाडी : ओरोस येथील जिल्हा न्यायालयात तारखेला हजर करून पुन्हा सावंतवाडीतील कारागृहात जात असताना आरोपी नंदकिशोर बाबूराव सावंत (वय ३३, रा. कुडाळ) याने पोलिसांच्या हाताचा चावा घेत येथील मोती तलावात उडी टाकली. यावेळी आरोपीसोबत असणाऱ्या दोन पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याला बाहेर काढण्यासाठी तलावात उडी मारली. यावेळी आरोपीसोबत झालेल्या झटापटीत पोलिसांच्या जिवावर हा प्रसंग बेतणार होता. मात्र, जागरूक नागरिकांनी बोटीच्या साहाय्याने दोन्ही पोलिसांना बाहेर काढले, तर आरोपी नंदकिशोर सावंत याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान, आरोपीला वाचवण्यास गेलेल्या पोलिसांच्या छातीत व पोटात पाणी गेल्याने दोन्ही पोलिस अत्यवस्थ असून, येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. ३१ मे २०१५ ला  कुडाळ येथे स्वत:च्या वडिलांवर पाळ-कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नंदकिशोर बाबूराव सावंत याला निकाल लागेपर्यंत सावंतवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते. पोलिस त्याला प्रत्येक तारखेला ओरोस येथील न्यायालयात हजेरीसाठी घेऊन जात होते. त्याप्रमाणेच शुक्रवारी सकाळी ओरोस येथील मुख्यालयातील पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गवस व पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण हे दोघे सकाळी सावंतवाडीत आले. त्यांनी कारागृहातून आरोपी नंदकिशोर सावंत याला ताब्यात घेतले व एस.टी.नेच ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन गेले होते. तेथे त्याला २७ मे ही पुढील तारीख मिळाल्याने पोलिसांनी आरोपीला घेऊन सावंतवाडीकडे प्रयाण केले. दुपारी १ च्या सुमारास सावंतवाडीत आल्यानंतर आरोपीला घेऊन ते एस.टी. बसस्थानकावरून कारागृहाकडे पायी जात होते. यावेळी मोती तलावाच्या काठावरून चालत असताना आरोपीने प्रदीप चव्हाण या पोलिसाच्या हाताचा चावा घेत मोती तलावात उडी घेतली. यामुळे दोन्ही पोलिस भेदरून गेले.या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रणजित देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच मोती तलावात बुडालेल्या आरोपीच्या शोधासाठी सांगेली येथील बाबल आल्मेडा टीमला पाचारण केले. आल्मेडा यांच्या टीमने साडेतीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मोती तलावात शोधाशोध केली; परंतु आरोपी सावंत उशिरापर्यंत सापडला नव्हता. आरोपींना बेड्या नाहीत, गाड्यांची कमतरताएखाद्या आरोपीला सावंतवाडी कारागृहातून ओरोस येथील न्यायालयात तारखेसाठी घेऊन जात असताना सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरोपीच्या हातात बेड्या घालता येत नाहीत. तसेच आरोपींना ने-आण करण्यासाठी गाड्यांची कमतरता असल्याने एस.टी. बसनेच आरोपींची ने-आण केली जाते. त्यामुळे अनेकवेळा आरोपी पोलिसांच्या असहायतेचा गैरफायदा घेतात, अशी चर्चा उपस्थित नागरिकांतून होत होती. आरोपी मेकॅनिक इंजिनिअर, मात्र मनोरुग्णआरोपी नंदकिशोर सावंत हा उच्चशिक्षित होता. मात्र, तो मनोरुग्ण होता, असे त्याच्या आईनेच वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पोलिसांना सांगितले होते. आरोपी सावंत याच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपी हा पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. (प्रतिनिधी)तलावात आरोपीसोबत पोलिसांची झटापटआरोपी नंदकिशोर सावंत याने मोती तलावात उडी मारल्यानंतर क्षणाचा विलंब न लावता पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण यांनी तलावात उडी मारत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीसोबत पोलिस चव्हाण यांची झटापटही झाली. आरोपीने पोलिस चव्हाण यांनाच आपल्या मिठीत घेत आपल्या बरोबर बुडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तलावाकाठी एकच खळबळ माजली.बाबल आल्मेडा टीमकडून तलावात मृतदेहाचा शोधसावंतवाडी मोती तलावात उडी मारलेला आरोपी नंदकिशोर सावंत उशिरापर्यंत सापडला नव्हता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगेली येथील बाबल आल्मेडा यांच्यासह अभय किनळोस्कर, सुनील मडगावकर, दीपेश शिंदे, बाबा फर्नांडिस आदींनी तलावात उतरून शोधाशोध केली. सायंकाळी उशिरा मालवण येथील स्कुबा ड्रायव्हर्सच्या पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला.सीआयडी पथक सावंतवाडीत दाखलशुक्रवारी झालेल्या आरोपीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सीआयडीच्या अप्पर पोलिस अधिक्षका एस. काळे या सायंकाळी उशिरा दाखल झाल्या. घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक कांबळे उपस्थित होते.