शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, खारेपाटण येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 7:01 PM

खारेपाटण : सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत असूनही नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून ...

ठळक मुद्दे बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, खारेपाटण येथील प्रकार१६०० रुपये दंड वसूल, कणकवली तहसीलदार स्वत: झाले सहभागी

खारेपाटण : सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण वाढत असूनही नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून गर्दी करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी खारेपाटण मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीच्यावतीने कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून १६०० रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला.यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण-तळेरे मंडळ अधिकारी मंगेश यादव, उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, महेंद्र गुरव, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, ग्रामपंचयात लिपिक शैलेंद्र शेट्ये आदी उपस्थित होते.दुपारी १२ वाजता बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्या एकूण ८ जणांवर ग्रामपंचायत व ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीच्यावतीने कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी २०० रुपयांची पावती दंड आकारणी म्हणून घेण्यात आली.प्रत्येकाला मास्कची सक्ती करा : आर. जे. पवारसर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मास्क लावण्यासाठी सक्ती करावी व स्वत:ही मास्क लावावा. मास्क लावण्याचे फायदे अनेक आहेत. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कोविड-१९ शासन नियमानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सर्व नागरिकांनी कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेऊन स्थानिक ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती, महसूल, पोलीस व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे. शासन व प्रशासनाला सहकार्य केल्यास महामारीला रोखणे सोपे जाईल, असे मत तहसीलदार आर. जे. पवार यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग