सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुंबई - गोवा महामार्गावरील बांदा कट्टा येथे गोवा बनावटीची अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत 9 लाख 96 हजाराच्या दारूसह 18 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक एकनाथ जयबल व रमराव जयभल रा. बीड या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसात ही दुसरी मोठी कारवाई आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील उपनिरीक्षक रविराज फडनीस तसेच एस.जी.खांडारे, गुरूनाथ कोयंडे, अनिल धुरी, अनुप खंडे, प्रवीण वालावलकर, मनोज राऊत, जयेश सरमळकर यांनी ही कारवाई केली. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ट्रक सह 17 लाख 96 लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.संशयितांवर बांदा पोलिसांत गुन्हा दाखलस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला दारू वाहतुकी बाबत सुगावा लागला होता. त्यानुसार हे पथक बांदा येथे तैनात होते. दरम्यान दारू भरून ट्रक गोवा ते आंबोली मार्गे बीड येथे जात होता. दरम्यान हा ट्रक (एम.एच. 12- डिजी 8419) बांदा येथे आला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.