सावंतवाडी : शहरात रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या वाढतच असून बुधवारी सलग चौथ्या दिवशी शहरामध्ये चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये दोघे शहरातील, तर दोघे ग्रामीण भागातील असल्याचे नगरपरिषदेचे डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. तसेच दुसरीकडे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या ब्युटीपार्लरवर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बुधवारी स्वतः कारवाई करत संबंधीत दुकान पंधरा दिवसांसाठी सील केले.शासनाकडून जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवून जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी अकरापर्यंत खरेदीसाठी मुभा दिली असतानाच शहरामध्ये विनाकारण गर्दी करणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस यंत्रणेकडून यावर उपाय म्हणून रॅपिड टेस्टची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेले चार-पाच दिवस ही मोहीम सकाळच्या सत्रात राबविण्यात येते.मात्र, या मोहिमेमध्ये दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी ६४ लोकांमागे ४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दररोज मिळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे एकप्रकारे भीती व्यक्त केली जात आहे.पालिका प्रशासनाबरोबरच पोलीस यंत्रणेकडून सकाळपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरामध्ये नेहमीपेक्षा सायंकाळच्या सत्रामध्ये काहीसा शुकशुकाट पाहायला मिळाला. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून कसोशीने चौकशी केली जात होती. मेडिकल वगळता इतर कारणांसाठी फिरणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत होते.कोरोना महामारीमध्ये शासनाने केशकर्तनालय तसेच ब्युटीपार्लर यांना बंदी घातली असतानाच, शहरातील खासकिलवाडा येथे सुरू असलेल्या एका ब्युटीपार्लरवर, त्याठिकाणी जाऊन मुख्याधिकारी जावडेकर यांनी धाड टाकत संबंधितावर दंडात्मक कारवाई करून ते ब्युटीपार्लर पुढील पंधरा दिवसांसाठी सील केले आहे.
त्या ब्युटीपार्लरवर पालिकेकडून कारवाई, विनाकारण फिरणारे चौघे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 6:13 PM
CoronaVirus Sindhudurg : सावंतवाडी शहरात रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या वाढतच असून बुधवारी सलग चौथ्या दिवशी शहरामध्ये चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये दोघे शहरातील, तर दोघे ग्रामीण भागातील असल्याचे नगरपरिषदेचे डॉ. उमेश मसुरकर यांनी सांगितले. तसेच दुसरीकडे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या ब्युटीपार्लरवर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी बुधवारी स्वतः कारवाई करत संबंधीत दुकान पंधरा दिवसांसाठी सील केले.
ठळक मुद्देत्या ब्युटीपार्लरवर पालिकेकडून कारवाई विनाकारण फिरणारे चौघे पॉझिटिव्ह