मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील अनधिकृत एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने सातत्य राखत सलग दुसऱ्यांदा मंगळवारी मध्यरात्री गोव्यातील एलईडी नौकेवर कारवाई केली. या नौकेवर सापडून आलेल्या विविध प्रकारच्या मासळीचा ६१ हजार ७०० रुपये इतका लिलाव झाला.नौकेवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे गुरुवारी सादर करण्यात आला, अशी माहिती परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांनी दिली. मत्स्य व्यवसाय विभागाने रविवारी रात्री येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणारी एक एलईडी नौका पकडली होती. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री पुन्हा उत्तर गोवा येथील एक नौका पकडल्याने खळबळ माजली आहे.६१ हजार ७00 रुपयांच्या मासळीचा लिलावफ्रान्सिस्को सिल्वेरा यांच्या मालकीची सांव पावलो ही एलईडी नौका पकडण्यात आली. या नौकेवर बांगडा, बळा, कर्ली, गेदर, टोळ, राणे, बुगडी आदी प्रकारची मासळी आढळून आली. बुधवारी रात्री उशिरा लिलाव प्रक्रियेची कारवाई पूर्ण झाली. यात ६१ हजार ७०० रुपयांच्या मासळीचा लिलाव झाला.
त्या एलईडी नौकेवर कारवाई, मत्स्य विभाग सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:38 AM
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील अनधिकृत एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने सातत्य राखत सलग दुसऱ्यांदा मंगळवारी मध्यरात्री गोव्यातील एलईडी नौकेवर कारवाई केली. या नौकेवर सापडून आलेल्या विविध प्रकारच्या मासळीचा ६१ हजार ७०० रुपये इतका लिलाव झाला.
ठळक मुद्देत्या एलईडी नौकेवर कारवाई, मत्स्य विभाग सतर्कनौकेवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदारांना सादर