वैभव साळकरदोडामार्ग : महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार प्राप्त दोडामार्ग तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचे १३ व्या वर्षातील पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यातील फरा आदर्श पत्रकारिता पुरस्कार लोकमत सिंधुदुर्गचे उपमुख्य उपसंपादक महेश सरनाईक यांना जाहीर झाला आहे.या पुरस्कारांचे वितरण २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग मधील वसंत सांस्कृतिक ( परमेकर) सभागृहात होणार असल्याची माहिती फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ॲड. सोनू गवस, कुंब्रलचे माजी सरपंच तथा समिती सदस्य प्रवीण परब, संतोष देसाई, तेजस देसाई, सर्वेश देसाई आदी उपस्थित होते.तर वरील सर्व पुरस्कार निवडीसाठी प्रेमानंद देसाई, ॲड. पी.डी. देसाई, ॲड. सोनू गवस, रामा ठाकूर, तेजस देसाई, संतोष देसाई, रत्नदीप गवस, अमित दळवी , संदीप पाटील, प्रवीण परब यांनी काम पाहिले. या पुरस्कारात शाल, श्रीफळ, पुस्तक, पुष्प, फरा प्रतिष्ठान लोगो, सन्मानपत्र, सन्मानचित्र असे पुरस्कार वितरणाचे स्वरूप असणार आहे.या मान्यवरांचा होणार गौरवआदर्श शिक्षक फरा पुरस्कार केशव जाधव ( माडखोल शाळा , ता. सावंतवाडी ), अध्यापन भास्कर फरा पुरस्कार दीपक सामंत ( माड्याचीवाडी, ता. कुडाळ ), आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार महेश सरनाईक ( लोकमत सिंधुदुर्ग), स्नेहा विष्णू स्मृती नाट्य रंगकर्मी फरा पुरस्कार बाबा सावंत ( रोणापाल, ता. सावंतवाडी ), हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार रेश्मा कोरगावकर ( दोडामार्ग ), आरोग्यसेवा फरा पुरस्कार डॉ. रामदास रेडकर ( कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग ), स्मार्टग्राम फरा पुरस्कार ग्रामपंचायत परुळे बाजार ता. वेंगुर्ला, ( सरपंच प्रदीप प्रभू ), आदर्श कृषिरत्न फरा पुरस्कार प्रमोद दळवी ( विलवडे, ता. सावंतवाडी ) आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा फरा पुरस्कार समीर रोहिदास ठाकूर ( पत्रकार, आयनोडे, दोडामार्ग), संगीता शामसुंदर स्मृती आदर्श संगीत सेवा फरा पुरस्कार महादेव तुकाराम सुतार ( शारदा संगीत विद्यालय, ता. दोडामार्ग ), शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा फरा पुरस्कार शैलेश सावंत ( माजगाव ता. सावंतवाडी ),
आदर्श भजनी सेवा फरा पुरस्कार विश्वनाथ भाई नाईक ( वेतोरे, ता. वेंगुर्ला ), आदर्श ग्रामसेवा फरा पुरस्कार श्रीरंग जाधव ( चौकुळ ), अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा जीवनगौरव फरा भूषण पुरस्कार हरिश्चंद्र भिसे गुरुजी ( कळणे, ता. दोडामार्ग ), आदर्श भारतमाता सेवा फरा पुरस्कार प्रभाकर देसाई ( केर, ता. दोडामार्ग ), आदर्श ग्रामरत्न पुरस्कार भगवान देसाई आदींना पुरस्कार देण्याचे घोषित करण्यात आले आहे. तर आपत्कालीन पथकातील बाबल आल्मेडा टीमचे यांसह निवृत्त कृषी विस्तार अधिकारी रामा ठाकूर, निवृत्त मुख्याध्यापक सगुण कवठणकर यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे.