सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावे. सध्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ३० खाटा शिल्लक असून, अतिरिक्त २०० खाटांची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे.सार्वजनिक वाहतूक बंद होणार नाही. तरीही एसटी सेवा बंद झाल्यास त्याची चौकशी केली जाईल. तसेच जिल्ह्याच्या सीमांवर, तसेच रेल्वे स्थानकात कोविड तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.बुधवारी सायंकाळी मंत्री सामंत यांनी ह्यझूमह्ण वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधण्यात आला असून, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले. तसेच सध्या रुग्ण वाढत असल्याने खाटा कमी पडत आहेत. या खाटा खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून वाढविण्यात येणार आहेत. यासाठी सर्व्हेही करण्यात आला असून, २०० खाटा अधिक वाढविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आणखी खासगी रुग्णालये खाटा देणार असतील तर त्यांच्याही खाटा घेण्यात येतील. जिल्हाधिकारी स्तरावर चर्चा करून निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सीमेवरही तपासणीमुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून रेल्वे स्थानकांवर कोविड कक्ष उभारला आहे. तेथे पथके तैनात करण्यात आली आहेत. सिंधुदुर्गच्या सीमेवरही अशाचप्रकारे तपासणी करण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्यांनी जर आपला अहवाल घेऊन आल्यास ते अधिक चांगले होईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.निधीबाबत कमतरता भासणार नाहीकोरोना रोखण्यासाठी आरोग्यावर नियोजनमधून ३० टक्के खर्च करण्यात येणार असून, तशी परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाबाबत कोणतेही निर्णय घ्यायचे झाल्यास निधीबाबत कमतरता भासणार नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा कुठेही बंद करण्यात आली नाही. तरीही जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याबाबत निर्णय झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. सध्यातरी एसटी सुरू राहील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात अतिरिक्त 200 खाटांची व्यवस्था करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 5:21 PM
CoronaVirus Sawantwadi Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने सहकार्य करावे. सध्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ३० खाटा शिल्लक असून, अतिरिक्त २०० खाटांची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे.
ठळक मुद्देउदय सामंत यांनी दिली माहिती रेल्वे स्थानकांवर तपासणी होणार : एसटी सेवा सुरू राहणार