रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातही क आणि ड संवर्गातील रिक्त पदांची समस्या सतावत असून, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. क संवर्गातील एकूण ९३० मंजूर पदांपैकी ८५६ पदे भरण्यात आली असून, ७४ पदे अद्याप रिक्त आहेत. तर ड संवर्गातील एकूण ५६३ मंजूर पदांपैकी ३२२ पदे भरण्यात आली असून, तब्बल २०२ पदे अद्याप रिक्तच आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या ठिकाणाहून तसेच ग्रामीण भागातून अनेक नागरिक विविध कामांसाठी येत असतात. मात्र, या कार्यालयात क व ड श्रेणी कर्मचाऱ्यांची विविध मंजूर पदे आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी पदे रिक्त आहेत. त्यामुळे, आहे त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार उचलावा लागत आहे. याचा परिणाम काही नागरिकांच्या कामावरही होत आहे. त्यातच हे जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असल्याने, विविध मंत्र्यांचे दौरे, विविध कार्यक्रम, प्रशिक्षणे सातत्याने होत असतात. त्यामुळे, आहे त्याच कर्मचाऱ्यांना ही सर्व कामे निभावून न्यावी लागतात. परिणामी आहे तीच कामे या कर्मचाऱ्यांना भारी पडत असतानाच, रिक्त पदांचा भारही सोसावा लागत आहे. त्यातच बदली, पदोन्नतीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची आधीची पदे रिक्त राहतात. या रिक्त पदी नियुक्ती लवकर केली जात नसल्याने आहे त्याच कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा डोलारा सांभाळावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब होत आहे. तलाठी, लिपीक-टंकलेखक यांच्याच रिक्त पदांची संख्या जास्त आहे. तर ड संवर्गातील कोतवाल आणि स्वच्छक ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.या कार्यालयात काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही सेवानिवृत्त होत आहेत. या महिन्यांनी इतर विभागातील काही प्रमुखही सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र, शासनाच्या धोरणामुळे झालेल्या रिक्त पदाचा कोटा भरण्यास विलंब होतो. विधानसभा निवडणूक आॅक्टोबरमध्ये झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांची बदली पालगड (कोकणातील नवनिर्वाचित जिल्हा) येथे झाली. त्यांच्या पदाचा तात्पुरता कार्यभार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता सावंत - शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, याला आता अनेक महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप जिल्हा पुरवठा अधिकारी पद रिक्त आहे.तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी नंदकुमार जाधव नोव्हेंबरअखेर सेवानिवृत्त झाले असले, तरी अजूनही हे पद भरले गेलेले नाही. या विभागाची जबाबदारी सध्या पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आलेली आहे. जनतेची कामे या रिक्त पदांमुळे खोळंबली जात आहेत. जनतेला एका कामासाठी वारंवार खेटे मारावे लागतात. त्यामुळे, वेळबरोबरच पैशाचाही अपव्यय होत आहे. शासन ही पदे भरण्याबाबत उदासीनता का दाखवत आहे, असा सवाल नागरिकांमधून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कर्मचारी वैतागले...निवडणूक काळात तर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची खूपच ओढाताण होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हे अतिरिक्त काम वाढत असल्याने सेवेच्या आठ तासांच्या पलिकडेही जादा काम करावे लागत होते. त्यामुळे रिक्त पदांचा भार विनाकरण कार्यरत कर्मचाऱ्यांना सोसावा लागत होता.मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदेक संवर्गातील कर्मचारीपदेमंजूरभरलेलीरिक्तलघुलेखक(उच्च श्रेणी)११०लघुलेखक(निवड श्रेणी)७५२अव्वल कारकून १७२१६७५मंडळ अधिकारी ७०६५५लिपीक -टंकलेखक २६०२२२३८तलाठी ३९९३७५२४लघुटंकलेखक२२०वाहन चालक१९१९०राजापूूर ५१३९७०९एकूण९३०८५६७४ड संवर्गातील कर्मचारी(शिपाई, पहारेकरी)पदेमंजूरभरलेलीरिक्तस्वच्छक, हमाल कम स्वीपर१५५१२९२६नाईक१४१७०कोतवाल३९४२१८१७६
प्रशासनाला अतिरिक्त कामाचे ‘शासन’
By admin | Published: February 18, 2015 10:11 PM