सावंतवाडी : गेले चार महिने रिक्त असलेल्या सावंतवाडी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर सुधीर आडिवरेकर यांची नियुक्ती करत उलटसुलट होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे. निवडीची घोषणा शुक्रवारी रात्री माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथे केली.यावेळी आमदार नितेश राणे, काँग्रेस प्रवक्ते जयेंद्र परूळेकर, शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, युवकचे लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष आनंद शिरवलकर, तालुकाध्यक्ष संजू परब, प्रमोद कामत, सुदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.सावंतवाडी शहराध्यक्ष म्हणून गेली तीन वर्षे मंदार नार्वेकर हे धुरा सांभाळत होते. मात्र, ऐन गणेश चतुर्थीच्या काळात त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला. या पदासाठी दहा जणांनी अर्ज भरले होते. मात्र, इच्छुकांची संख्या जास्त असल्याने शहराध्यक्षपदाचा निर्णय तब्बल चार महिने लांबणीवर पडला होता. सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी रात्री उशिरा कणकवलीत बैठक झाली. त्यावेळी शहराध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)नारायण राणेंचा विश्वास सार्थ ठरवेन : आडिवरेकरकाँग्रेस पक्षाने तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे, ती मी सार्थ ठरवेन. आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्षाला जास्तीत जास्त यश मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरात लवकर पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे यावेळी नूतन शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी सांगितले.एकमताने निवड : परब यांचा दावासावंतवाडी शहराध्यक्षपदी सुधीर आडिवरेकर यांची निवड एकमताने करण्यात आल्याचा दावा तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केला. अनेक जण दावेदार होते. मात्र, त्यातून पक्षाने आडिवरेकर यांना संधी दिली. इतर दावेदारांचा योग्य तो सन्मान केला जाईल, असे सांगत कोणीही नाराज नाही, असा दावा तालुकाध्यक्षांनी केला.निवडीनंतर सावंतवाडीत आतषबाजीसावंतवाडी शहराध्यक्षपदी सुधीर आडिवरेकर यांची निवड झाल्याचे समजताच शनिवारी येथील खासदार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. यावेळी गोट्या वाडकर, गुरू वारंग, दिलीप भालेकर, अरूण भिसे, प्रशांत साटेलकर, केतन आजगावकर, अमोल साटेलकर उपस्थित होते.
शहराध्यक्षपदाची धुरा आडिवरेकरांकडे
By admin | Published: December 27, 2015 12:09 AM