शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी प्रशासनाची पूर्वतयारी पूर्ण, पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी दिली माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 17, 2024 7:28 PM

लांबून येणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था

मनोज वारंगओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पोलिस प्रशासनाची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी ४० अधिकारी आणि २०० कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी  साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.साैरभ अग्रवाल म्हणाले, पोलिस भरतीतील १६०० मीटर आणि ८०० मीटर धावणे हा प्रकार रस्त्यावर घेतला जाणार आहे. तर १०० मीटर धावणे ही मैदानी परीक्षा पोलिस परेड मैदानावर घेण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञांचे मत घेऊन मैदान तयार करण्यात आले आहे.

पावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून व्यवस्थापावसामुळे व्यत्यय येऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीवर दुष्परिणाम होणार नाही. त्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस दल सज्ज आहे.

खास वैद्यकीय पथक नियुक्तउमेदवाराला कोणतीही दुखापत होणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत,  खास वैद्यकीय पथक  नियुक्त करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६:३० वाजता ही परीक्षा सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी ५०० उमेदवार बोलाविण्यात आले आहेत. इतर दिवशी साडेसातशे उमेदवार बोलाविण्यात आले आहेत. याची माहिती उमेदवारांना ई मेल, मॅसेज आणि कॉल करून देण्यात आली आहे.

एकुण १८ हजार ४२ अर्ज दाखलजिल्ह्यात ११३ शिपाई पदासाठी ५ हजार ९२०, पाच बँड पथक पदासाठी ६८३ आणि २४ चालक पदासाठी एक हजार ३३९ अशाप्रकारे एकूण १८ हजार ४२ अर्ज दाखल झाल्याचे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले...तर पुरावा सादर कराही परीक्षा पारदर्शी घेतली जाणार आहे. एखाद्या दिवशी दिवसभर पाऊस पडल्यास त्या उमेदवारांना १ जुलै नंतरची वेळ दिली जाणार आहे. तसेच एकाचवेळी राज्यभर भरती प्रक्रिया होत असल्याने कोणत्याही एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्यास मुभा होती. परंतु एखाद्या उमेदवाराने अन्य पदासाठी अर्ज दाखल केला असल्यास आणि आम्ही बोलाविलेल्या दिवशीच तिकडे मैदानी परीक्षा असल्याने तो गैरहजर राहिल्याचा पुरावा सादर केल्यास त्याला नंतरची वेळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लांबून येणाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्थाराज्यातील सर्व मैदानी परीक्षा पूर्ण झाल्यावर एकावेळी लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच सिंधुदुर्गात उमेदवार कमी असल्याने धावण्याच्या परीक्षेसाठी चीप वापरली जाणार नाही. स्टॉप वॉच वापरले जाणार आहे. डॉक्युमेंट पडताळणी होमगार्ड कार्यालय येथे होणार आहे. लांबून येणाऱ्या उमेदवारांच्या राहण्यासाठी होमगार्ड कार्यालय, अन्य शासकीय कार्यालये तसेच मंगल कार्यालये येथे व्यवस्था करण्यात आली आहे.संपूर्ण स्पर्धेची व्हिडीओग्राफी होणारउंची, छाती, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे आणि गोळा फेक अशी पुरुषांची तर उंची, १०० मीटर धावणे आणि, ८०० मीटर धावणे आणि गोळा फेक अशी महिला उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. या पूर्ण स्पर्धेची व्हिडीओ ग्राफी केली जाणार आहे, असे यावेळी पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस