शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
2
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
3
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
4
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
5
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

शैक्षणिक आराखड्यात सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करा - शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

By अनंत खं.जाधव | Published: December 05, 2023 2:18 PM

शिक्षण धोरण सुकाणू समिती बैठक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ञ शिक्षक सहभागी

सावंतवाडी : राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा करताना अभ्यासक्रमामुळे बालकांवर ताण येता नये अशा पद्धतीने अभ्यासक्रम आराखडा बनविण्यात यावा. सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आराखड्यामध्ये सर्व शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सुकाणू समिती बैठकीत दिले.मुंबई येथील जवाहर बालभवन येथे पायाभूत शैक्षणिक आराखडा निश्चितीबाबत राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकानु समितीची बैठक शिक्षण मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत शिक्षण मुख्य सचिव रणजितसिंह देवोल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे शिक्षण संचालक अमोल येडगे, राज्य प्रकल्प संचालक प्रदीप कुमार डांगे, एकात्मिक बालविकास सहाययक आयुक्त अरविंद रामनामे, शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, महेश पालकर , माजी कुलगुरू सुहास पेडणेकर तर सिंधुदुर्ग मधून शिक्षण तज्ञ भरत गावडे व  प्रा सुषमा मांजरेकर, सर्व शासकीय, अशासकीय सदस्य सहभागी झाले होते.पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमाबाबत सूचना देताना मंत्री केसरकर पुढे म्हणाले, शालेय शिक्षण विभागाने बालरोग तज्ञ संघटनेवरोवर करार केला आहे. अभ्यासक्रम बनविताना बालमानाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. बाल मानसोपचारतज्ञ यांचेही मार्गदर्शन घेण्यात यावे. मुलांवर अभ्यासक्रमाचे दडपण येणार नाही, याची खबरदारी घ्या. याबाबत तज्ञांचे पॅनल तयार करावे.त्यांचे मत जाणून घेऊन अभ्यासक्रम तयार करावा. पॅनेलमध्ये बाल मानसशास्त्र तज्ञ, आंतरराष्ट्रीय शाळा तज्ञ, सीबीएससी शाळा अभ्यासक्रमातील तज्ञ, बोर्डाच्या शाळा अभ्यासक्रमातील तज्ञ यांचा समावेश करावा. तज्ञांचा अहवाल घ्यावा. बोलीभाषा व मराठी भाषा यांची सांगड घालावी. मुलांना आनंद मिळावा अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करण्यात यावा. बोलीभाषेतून भाषा ज्ञान देण्यात यावे. अभ्यासक्रम अंतिम होण्यापूर्वी तज्ञांच्या माध्यमातून विचारमंथन होणे आवश्यक आहे. सर्वंकष अभ्यासक्रम तयार झाला पाहिजे. अध्यापनावाबत शाळांमध्ये पालकांचा प्रतिसाद घेण्यात यावा. पालकांच्या प्रतिसादानुसार शिक्षकांनी अध्यपनात बदल करावा. महिन्यातून किमान एकवेळा तरी पालकांचा प्रतिसाद घ्यावा. मुलांच्या शाळांची वेळ व शाळेतील कालावधी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित करावा. शालेय संशोधन तपासून धोरण निश्चित करावे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतंत्र शाळेसोबतच आठवड्यातून किमान एक किंवा दोन दिवस इतर विद्यार्थ्यासमवेत शिक्षण देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून त्यांच्यातील न्यूनगंड दूर होईल, अशा सूचना मंत्री केसरकर यांनी केल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Educationशिक्षण