शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सावधान! झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ बघताय? आरोग्यावर 'हा' होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:43 PM

मोबाइलवर सतत सोशल मीडिया पाहण्याच्या सवयीचा विपरीत परिणाम

सुधीर राणेकणकवली : सध्याच्या धावपळीच्या युगात  अनेकांच्या जीवनात मोबाइल ही  अत्यावश्यक बाब बनली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री अंथरुणात असतानाही तो सोबतच असतो. मोबाइलवर सतत सोशल मीडिया पाहण्याच्या सवयीचा विपरीत परिणाम हा अनेकांच्या झोपेवर होत आहे.त्यामुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडत आहे. झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ पाहणे टाळणे आवश्यक आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या हाती मोबाइल आला आहे.अनेक व्यक्तींना मोबाइल पाहत लोळण्याची सवय असते. तशाच अवस्थेत झोपही लागते. पण फोन चालूच असतो. मध्येच नोटिफिकेशन वाजल्यास खडबडून जाग येते. अनेकांना झोपेत मध्येच उठून उगीचच सोशल मीडिया बघण्याची सवय असते.दिवसभर मोबाइल वापरूनसुध्दा रात्री झोपताना मोबाइल हातात घेतला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होऊ शकत नाही. मोबाइलमुळे सतत थकवा जाणवतो. उत्साह राहत नसल्याने त्याचा कामावरही परिणाम होत असतो.

२० मिनिटांचा घ्या ब्रेक!नोकरी, व्यवसाय करत असताना अनेकांना मोबाइल किंवा कॉम्प्युटरचा वापर सारखा करावा लागतो. त्यांनी दर २० मिनिटांनी मोबाइलपासून पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा. यावेळेस तोंडावर पाणी मारणे, थोडे चालणे अशा सवयी लावून घ्याव्यात.

झोपेचे दोन-चार तास मोबाइलवर !प्रत्येक व्यक्तीच्या शरीरास कमीत कमी सहा तास झोप आवश्यक असते. पुरेशी झोप शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र, आता प्रत्येक व्यक्ती रात्री मनोरंजन म्हणून मोबाइल हाती घेऊन बसतो. एकदा मोबाइल हाती घेतला की दोन ते चार तास मोबाइलमध्ये गुंतून राहावे लागते. त्यामुळे झोपेचे दोन ते चार तास मोबाइलवरच जातात.

रात्री १० वाजल्यापासून मोबाइल दूर ठेवलेलाच उत्तम. मात्र, कामानिमित्त मोबाइलचा वापर करावाच लागत असेल, तरी ऑडियो-व्हिडिओ पाहण्याचे टाळावे. झोपतेवेळी मात्र, मोबाइल शरीरापासून दूर ठेवावा. मोबाइलचा डोळे तसेच मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. झोप पुरेशी न झाल्याने दुसऱ्या दिवशी उत्साह राहत नाही. त्यामुळे मोबाइलचा वापर कमी करावा.हे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. -आशा ठाकूर,  मनोविकारतज्ज्ञ.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडिया