कणकवली: कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून कणकवलीत भगवे वादळ निर्माण केले जाणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. वीर सावरकर यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना अडविण्याची हिंमत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्यात नव्हती. आता सत्ता गेल्यानंतर ते ठणकवण्याची भाषा करीत आहेत. ही त्यांची नौटंकी असल्याची टीका राणे यांनी केली. तसेच आगामी काळात भाजपा - शिवसेना युती करुनच सर्व निवडणुका लढवणार असल्याचेही स्पष्ट केले.कणकवली येथे आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, दामोदर सावंत आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, राहुल गांधी, नाना पटोले आणि काँग्रेसची मंडळी वीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करत आहेत. त्यांना योग्य तो संदेश देण्यासाठी आम्ही ५ एप्रिल रोजी कणकवलीत भव्य अशी वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. या यात्रेमध्ये सावरकर यांचा रथ असणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या भाषणांची चित्रफित दाखवली जाणार आहे. यात शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.कोणीही माफ करणार नाहीबाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच वीर सावरकर यांच्याबद्दल आदर बाळगला. सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या मनीशंकर अय्यर यांना जोडो मारो आंदोलन छेडले होते. मात्र त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी शांत राहणे पसंत केले. ते मुख्यमंत्री असताना राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर वारंवार टीका केली. परंतु ठाकरे यांनी त्यांना अडविण्याची हिंमत दाखवली नव्हती. आता सत्ता गेल्यानंतर ते ठणकवण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची नौटंकी आहे. ढोंगीपणा आहे, त्याना कोणीही माफ करणार नाही.झालेला सगळा त्रास बाहेर काढण्यासाठी शिंदे-फडणवीस एकत्र ग्रामपंचायत निवडणुकांप्रमाणेच यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून आम्ही लढविणार आहोत. महाविकास आघाडीने अडीच वर्षात आम्हाला प्रचंड त्रास दिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना तुरुंगामध्ये टाकले, काहींवर गुन्हे दाखल केले. आम्हाला झालेला हा सगळा त्रास बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावे लागले. युती कायम राहणारयुतीत कोणतेही वाद नाहीत, उलट चांगल्या समन्वयाने काम सुरु आहे. युतीत शिवसेनेचे चाळीस आणि दहा अपक्ष आमदार यांचा मोठा वाटा आहे. हे आमदार आमच्यासोबत आले म्हणूनच युतीचे सरकार होऊ शकले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती ही यापुढे देखील कायम राहणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
सत्ता गेल्यानंतर राहुल गांधींना ठणकवण्याची भाषा ही तर नौटंकी; नितेश राणेंची चपराक
By सुधीर राणे | Published: March 29, 2023 5:28 PM