सिंधुदुर्ग: जिल्ह्यात शेतीयोग्य पद्धतीने पाऊस कोसळत असल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात अधूनमधून पावसाचा जोर कायम असून महिनाभरापूर्वी पेरणी केलेल्या भाताची लावणी करण्याबरोबरच हंगामी उत्पन्न देणाऱ्या काकडी, चिबूड, दोडके, पडवळ, कणगी यासारख्या वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी गावोगावी वाफे तयार करण्याची लगबग सुरू आहे. मागील काही दिवस कोसळणाऱ्या पावसाने शेती पूरक पाणी उपलब्ध केले असून शेतकऱ्यांनी शेती कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. डोंगर भागात वाड्यावस्त्यांवर निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होण्यात पावसाने सध्या मोठी भूमिका बजावली आहे. विहिरींची पाणी पातळी वाढली असल्यामुळे गावात गावांमधील पाणी समस्या मार्गी लागली आहे.
सिंधुदुर्गात भात लावणीची लगबग, दमदार पावसामुळे शेतकरी गुंतला शेती कामात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 02, 2024 6:12 PM