शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 5:03 PM

पर्यटनाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जपा. ‘येवा कोकण आपलोच’ आसा म्हणून मालवणी माणूस तुम्हाला साद घालतच आहे. मात्र, बदनामीचे षडयंत्र आखू नका.

महेश सरनाईकतारकर्लीच्या दुर्घटनेपासून सध्या कोकणावर टीका करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फार फिरत आहेत. घाटमाथ्यावरील काही बोरू बहाद्दूर आपल्याला वाटेल तसे खमंग लिखाण करून संपूर्ण पर्यटन बदनाम करत आहेत. पर्यटनाला जाताना आपण वैयक्तिक काळजी घ्यायची नाही. कुठलीही बंधने पाळायची नाहीत. तुला काय समजते ? म्हणून आवर घालणाऱ्यांना उडवून लावायचे आणि आता दुर्घटना घडल्यानंतर संपूर्ण व्यवस्था किंवा पर्यटन कसे धोकादायक आहे, असे मांडून कोकणची खासकरून तारकर्ली, मालवण आणि रत्नागिरीतील गणपतीपुळे, मालगुंड किनाऱ्यावरील पर्यटनाची बदनामी करायची. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. कारण दुर्घटना ही दुर्घटना असते, ती काय कोण मुद्दामहून करत नाही, याची जाण ठेवावी.

कोरोनाच्या कालावधीत दोन वर्षे पर्यटनाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज काढून सुरू केलेले व्यवसाय पूर्णपणे फसले आहेत. कर्जबाजारी होण्याची पाळी या व्यावसायिकांवर आलेली आहे. मात्र, त्यातून सुटका होण्यासाठी शासन पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राधान्याने शासनावरच टाकली पाहिजे.कारण पर्यटकांना ज्या सुविधा शासनाकडून द्यायच्या आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या त्या होत नाहीत. त्यात काही अपुऱ्या सामग्रीच्या आधारावर येथील पर्यटन व्यावसायिक हा डोलारा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. अनेक समस्या आहेत. त्या समस्या सुटणाऱ्यादेखील नाहीत. मात्र, त्याबाबतचे रडगाणे गात राहिल्यास बँकेचा हप्ता कसा भरायचा? असा प्रश्नदेखील त्यांच्यासमोर आहे.समुद्री क्रीडाप्रकारात प्रत्येकवेळी लाईफ जॅकेट प्रत्येकाने घालणे कायद्याने बंधनकारक आहे. तसे ते मनुष्यासाठी  महत्त्वाचे आहे. त्यामुळे लाईफ जॅकेट घालूनच समुद्रसफारी करणे बंधनकारक आहे. जर कोणी ते वापर करत नसेल किंवा एखाद्या बोटीवर नसेल तर मग तशा बोटीची किंवा बोट मालकाची तक्रार एकाही पर्यटकाने कधी कोणाकडे केली नाही. आता दुर्घटना घडल्यानंतर अनेक जण जागे झाले आहेत आणि ते बेछूट आरोप करून उगाचच बदनामी करीत आहेत.

डबक्यात पोहणाऱ्याला लहरी समुद्र जो रोज आपले रूप बदलतो, ते सुद्धा डबकेच वाटते व पर्यटक त्यात उतरतो. स्थानिकांच्या सूचना ऐकत नाही किंवा ऐकून न ऐकल्यासारखे करतात. सावधगिरीचा इशारा त्यांना दिलेला चालत नाही, दारू पिणे व हुल्लडबाजी करणे यातच पर्यटकांना पर्यटन केल्याचा आनंद वाटतो.

पर्यटक मित्रांनो तुम्ही कोकणात गेला नाहीत तरी कोकणकरांचे काहीही नुकसान होणार नाही. उलट फायदाच होईल. तुम्हाला समुद्राचे आकर्षण आहे. तुम्हाला कोकणात जायचे आहे. तुम्हाला ताजे मासे, कोकणी मेवा खायचा आहे म्हणून तुम्हाला कोकणची गरज आहे. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा जर तुम्हाला कोकण हवे असेल तर कोकणी लोकांना मान द्या व त्यांच्या सूचना ऐकून तंतोतंत पालन करा व पर्यटनाचा आनंद घ्या.

अन्यथा जाऊच नका, उपद्रवी पर्यटकांची कोकणाला गरज नाही. यापुढे कोकणात जायचे असेल तर तेथील स्थानिक युवक योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला कोकण फिरवतील. त्यांना त्याचा योग्य मोबदला देऊन त्यांची मदत घ्या, अधिक माहितीसाठी संपर्क करा. केवळ कोकणाला दोष देऊन आपली अक्कल पाजळून काही होणार नाही. तर पर्यटनाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जपा. ‘येवा कोकण आपलोच’ आसा म्हणून मालवणी माणूस तुम्हाला साद घालतच आहे. मात्र, बदनामीचे षडयंत्र आखू नका.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन