शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

सांस्कृतिक केंद्राच्या कामासाठी आंदोलनात्मक पवित्रा

By admin | Published: November 10, 2015 10:29 PM

आम्ही चिपळूकरचा लढा : पारावर रंगली दिवाळी पहाट; सांस्कृतिक केंद्राची इमारत नादुरूस्त; नाट्यरसिकांमध्ये नाराजीचा सूर; निधीही मंजूर

चिपळूण : गेली १० वर्षे बंद पडलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम नगरपरिषद प्रशासनातर्फे सुरु करण्यात आले आहे. मात्र, गेले काही दिवस हे काम थंडावल्याने मुदतीत काम होणार अथवा नाही, याबाबत आम्ही चिपळूणकरतर्फे आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाणार आहे. सन २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची इमारत नादुरुस्त झाली. गेली १० वर्षे शहरवासीयांसाठी शहरात एकही करमणूक केंद्र नाही. त्यामुळे नाट्य व अन्य मनोरंजनात्मक बाबींपासून चिपळूणवासीय वंचित राहिले आहेत. सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. सांस्कृतिक केंद्राचे काम सुरु व्हावे म्हणून माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी प्रयत्न सुरु केले. या सांस्कृतिक केंद्रासाठी निधीही मंजूर झाला आहे. सांस्कृतिक केंद्र लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, याकरिता आम्ही चिपळूणकर संस्थेतर्फे नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सांस्कृतिक केंद्र नसल्याने आम्ही चिपळूणकरतर्फे पारावर विविध कार्यक्रमही घेण्यात आले. या माध्यमातून जनजागृती झाली. पावसाळ्यापूर्वी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरु असल्याने नाट्य रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्राचे काम ठेकेदाराला दिलेल्या मुदतीत होणार अथवा कसे, यामध्ये शंका निर्माण होत असल्याने आम्ही चिपळूणकरतर्फे पुन्हा नगर परिषदेसमोर केंद्राचे काम जलद गतीने व्हावे, यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. आज मंगळवारी दिवाळी पहाट संगीत मैफल हा कार्यक्रम पारावरच घेण्यात आला. चौकटच्या कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला टाळ्यांची साद देत रसिक या कलाकारांना दाद देत होते. कार्यक्रमाच्या शेवटी चौकटच्या सर्व कलाकारांचा आम्ही चिपळूणकरतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सूर आनंदघन या कवी मंगेश पाडगावकर यांच्या गीताने स्वाती कानडे आणि सायली कानडे यांनी केली. कार्यक्रमात आनंद पाटणकर, स्वरा केळकर, उदय गोरे, आशुतोष चितळे यांनी गीत सादर केली. हार्मोनियमची साथ हर्षल काटदरे यांनी, तर तबल्याची साथ उन्मेष जाधव, सिंंथेसायझर सुरेश काजारी, ताल-वाद्याची साथ प्रमोद जाधव, निरंजन केतकर यांनी दिली. मीरा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही चिपळूणकरतर्फे रसिकांना कार्यक्रमाला येताना सोबत एक पणती घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्व रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पणत्यांच्या उजेडाने गेली दहा वर्षे अंधारात राहिलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा परिसर दिवाळीच्या पहिल्या पहाटे उजळून निघाला. एक प्रकारे चिपळूणकर कलाकारांच्या सुरांनी आणि रसिकांनी आणलेल्या दिव्यांच्या उजेडाने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा अंधारलेला परिसर पुन्हा एकदा प्रकाशात येण्याची चिन्हे दिसू लागली.गेली १० वर्षे बंद पडलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नुतनीकरणाचे काम.गेले काही दिवस केंद्राचे काम थंडावल्याने मुदतीत काम नाही.केंद्राचे काम जलद गतीने होण्यासाठी नगर परिषदेसमोर आंदोलन.कलाकारांच्या प्रत्येक गीताला टाळ्यांनी दिली साद.