शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान; ९५ लाखांचा निधी मंजूर

By admin | Published: December 31, 2016 11:04 PM

सिंधुदुर्गातील २०१ शेतकऱ्यांची निवड : ४२ लाखांचा निधी उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी : कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी अवजारे (यंत्र सामग्री)चा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोडत पद्धतीने जिल्ह्यातील २०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. या योजनेसाठी शासनाने ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून, यापैकी ४२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.शेतकऱ्यांना स्वत:च्या मालकीची यंत्रे खरेदी करता यावीत, या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने त्याला शेती व्यवसायात प्रगती साधता यावी यासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाने सन २०१५-१६ पासून केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार ट्रॅक्टर, पॉवरटिलर, टिपर, ग्रासकटर, आदी शेतीविषयक अवजारांसाठी प्रवर्गनिहाय मागणीनुसार अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना यंत्राच्या किमतीच्या ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे, तर इतर शेतकऱ्यांना २५ टक्के, अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक ५० टक्के आणि अल्पभूधारक इतर शेतकरी यांना ४० टक्के अशाप्रकारे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, प्रस्ताव मंजूर करण्यात आलेल्या उपकरणांची किंमत सुमारे सहा कोटींच्या घरात जाते. यापैकी सरासरी ५० टक्के अनुदानाप्रमाणे अंदाज केल्यास किमान तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, शासनाने केवळ ९४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे उर्वरित अनेक प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी १५० प्रस्ताव मंजूरया योजनेचे सन २०१५-१६ या पहिल्याच वर्षी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला ६४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. त्याअंतर्गत एकूण ७५० प्रस्ताव कार्यालयाकडे प्राप्त झाले होते. यापैकी पहिला येईल त्याला प्राधान्य या पद्धतीने १५० प्रस्ताव मंजूर करून त्यांना लाभ देण्यात आला. मात्र, या निकषात शासनाने यावर्षी बदल करत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोडत पद्धतीने प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार दिले आहेत.वेरळ येथील बचत गटाला शेती अवजारे बँक मंजूरया योजनेंतर्गत भाडेतत्त्वावरही शेतकऱ्यांना शेती अवजारे उपलब्ध व्हावीत यासाठी ४० टक्के अनुदानावर शेती अवजारे बँक उपलब्ध करून देण्याच्या शासन आदेशानुसार यावर्षी जिल्ह्यातून प्राप्त प्रस्तावांमधून मालवण तालुक्यातील आधार स्वयंसहाय्यता बचत गट वेरळ यांनाही शेती अवजारे बँक मंजूर झाली आहे. या बँकेमार्फत शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर अवजारांचा पुरवठा करण्यात येणार आहे.यावर्षीसाठी २०१ प्रस्तावांची निवडसन २०१६-१७ साठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातून ९०८ शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. या प्रस्तावांमधून झालेल्या सोडतीत प्रवर्गनिहाय २०१ प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे, तर १७३ प्रस्ताव निवड करून प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहेत. निवड करण्यात आलेल्यांना ट्रॅक्टर, पॉवरटिलर, टिपर, ग्रासकटर, चाफकटर, चेन, सॉ मशीन, मळणी यंत्र, पॉवर स्प्रे, आदी यंत्रे दिली जाणार आहेत.