शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

कृषी सहलीचे पैसे परस्पर हडप

By admin | Published: March 20, 2015 10:58 PM

सावंतवाडी विभागातील प्रकार : सदस्याचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडी : कृषी विभागाने नेमलेल्या आत्मा समितीला विश्वासात न घेता परस्पर नागपूर येथे सहल काढून त्यांचा अडीच लाख रूपयांचा निधी परस्पर हडप केल्याचा प्रकार सावंतवाडी तालुका कृषी विभागात घडला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवताच त्यातील काही रक्कम भरण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला पण शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सावंतवाडी तालुका कृषी विभागाच्या कारभाराविरोधात आत्मा समितीचे सदस्य उपोषणाला बसणार आहेत. याबाबत परब यांनी निवेदनातून दिलेली माहिती अशी की, कृषी विभागाच्या आत्मा समितीत ४२ जणांचा समावेश होता. त्यातील ४२ जणांना स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, यातील सर्वच्या सर्व पंप निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे काहींनी पंप दुरूस्त केले मात्र, यातील १७ जणांनी आपले पंप कृषी विभागाला परत केले. हे पंप जमा करून १ वर्ष उलटले तरी या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत हे पंप अदा करण्यात आले नाही. याबाबत अनेकवेळा तालुका कृषी अधिकारी ईश्वर गुरव यांना आत्मा समितीच्या सदस्यांनी जाब विचारला असता, हे पंप लवकरच येतील अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम हे अधिकारी करीत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत स्प्रे पंप मिळाले नाहीत. त्यामुळे आत्मा समितीचे सदस्य चांगलेच आक्रमक बनले आहेत.फेबु्रवारी २०१४ मध्ये कृषी विभागाने आत्मा सदस्यांना सहलीचे आयोजन केले होते. मात्र, ज्या सदस्यांसाठी शासनाचा उपक्रम होता त्या सदस्यांना सहलीची माहितीच नव्हती. सहलीवर शासनाचे पंधराशे व स्वत:चे पंधराशे असे मिळून तीन हजार खर्च करण्याचे ठरले होते. त्यासाठी सदस्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. पण ही सहल नागपूर येथे जाणार हे निश्चित झाल्यावर त्यांच्या गाड्याही बुक केल्या. मात्र, सदस्यांना नागपूर येथे सहल जात असल्याची पुसटशी कल्पनाही दिली नाही. ज्या गाड्यांतून सहल नेली त्यात सदस्यांपेक्षा वेगळी माणसे नेण्यात आली. ती सदस्य तसेच कृषी मित्र असे दाखवल्याचा प्रकार उघड झाला आहे.आत्माच्या सदस्यांना घेऊन सहलीचे आयोजन करण्याचा शासनाचा उद्देश होता. मात्र, हा उद्देश येथील कृषी विभागाने असफल ठरवत सहलीसाठी नेलेल्या शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले. यात शासनाकडून दीड हजार व सदस्याचे दीड हजार असे तीन हजार रूपये घेण्याचे शासनाचे परिपत्रक होते. मात्र नियम धाब्यावर बसवून येथील कृषी विभाागाने सर्वच पैसे शेतकऱ्यांकडून घेतले होते. यावर सदस्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, आम्ही तुमचे पैसे काढून ठेवले आहेत, असे सांगितले. मात्र अद्यापही पैसे दिले नाहीत. (प्रतिनिधी)चौकशीची मागणी तालुका कृषी अधिकाऱ्यावर उत्तम परब यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी विभागात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. सर्व कृषी योजनेची चौकशी करावी, अशी मागणी करीत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा शुक्रवारी पत्रकातून दिला आहे.