शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर

By admin | Published: March 25, 2016 11:19 PM

६२४६ बंधारे पूर्ण : दहा हजारांचे होते उद्दिष्ट, तालुक्यांची आकडेवारी समाधानकारक

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी -भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या कच्चे व वनराईच्या १० हजार बंधाऱ्यांपैकी ६२४६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. उद्दिष्टाच्या ६२ टक्केच बंधारे घातल्याने आगामी काळात पाणी प्रश्न हा गंभीर होणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभाग मात्र बंधारे बांधण्यात अपयशी ठरला असून २२०० पैकी केवळ ५०६ बंधारे बांधले आहेत.गेल्या पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा शेकडोपटीने पाऊस कमी झाल्याने मे महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ पोहोचणार ही शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य तालुकास्तरावर, कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभागाला विभागून दिले होते. त्यानुसार आजअखेरपर्यंत यापैकी केवळ ६२४६ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. उद्दिष्टपूर्ती केवळ ६२ टक्केच असल्याने मे अखेरीस जिल्ह्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. सामाजिक वनीकरण विभागाला ३०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. मात्र, या विभागानेही केवळ ९५ बंधारे बांधण्यात समाधान मानले. उद्दिष्टाच्या केवळ ३१.६७ टक्के काम पूर्ण केले. त्यामुळे या विभागाची अनास्था दिसून आली.कणकवली१२७५८८२कुडाळ१२००८५४दोडामार्ग४५०४१३वेंगुर्ला६००४१९मालवण१२००८११देवगड१०५०९५८सावंतवाडी१२७५१००८वैभववाडी४५०३००एकूण७५००५६४५बंधाऱ्यांचे काम समाधानकारक७५०० बंधाऱ्यांपैकी ५६४५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. याची ७५.२७ टक्केवारी आहे. बंधाऱ्यांची एकूण टक्केवारी पाहता ६२.४६ टक्के आहे. सामाजिक वनीकरण व कृषी विभागाच्या नाकर्तेपणामुळेही टक्केवारी कमी झाली आहे. या दोन विभागांनी बंधाऱ्याच्या कामात प्रगती केली असली तर या टक्केवारीत वाढ होण्यास मदत होणार होती. आता ओहोळ, नदी या ठिकाणचा पाण्याचा प्रवाह थांबला असून आता बंधारे घालणे थांबले आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यात कृषी विभाग बॅकफुटवर गेला आहे.राज्य शासनाचा कृषी विभाग कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमीच चर्चेत असतो. जिल्हा परिषद प्रशासनाने या विभागाला २२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. जेणेकरून पाण्याची पातळी वाढावी व फळ पीक व शेतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध व्हावा.मात्र, या उद्दिष्टापैकी केवळ ५०६ बंधारेच या विभागाने बांधून पूर्ण केले आहेत.