शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शेतीच्या यांत्रिकीकरणाचा नियोजनबध्द आराखडा कृषि विभागाने तयार करावा : दीपक केसरकर

By admin | Published: April 20, 2017 5:16 PM

जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी, दि. २० : जिल्ह्यातील शेतक-यांनी उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा, प्रती वर्षी किमान खरीप, रब्बी हंगामासह तीन पिके घ्यावीत या अनुषंगाने कृषि विभागाने शेतीच्या यांत्रिकीकरणाचा नियोजनबध्द आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत केली.येथील जिल्हा नियोजन समितीच्या (जुन्या) सभागृहात आयोजित या खरीप हंगाम आढावा जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, जिल्हा कृषी अधिकारी म्हात्रे व कृषी विभागाचे अधिकारी तसेच खाते प्रमुख उपस्थित होते.सुधारित पध्दतीच्या भात जातीच्या लागवडीस प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रत्येक गावात माहिती देणारे बॅनर्स लावावेत अशी सूचना करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, कृषि विभागाने जिल्ह्यात गाव-निहाय किती विहीरी उपलब्ध आहेत, किती विहिरीवर पंप आहेत, याची माहिती संकलित करावी, पाण्याची साठवण वाढावी, शेतीला पुरेसे पाणी मिळावे यासाठी किती वळण बंधा-यांची गरज आहे. तसेच कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांची किती गरज आहे, याचेही सर्वेक्षण करुन अद्यावत माहिती संकलीत करावी. उपलब्ध पाण्याचा पुरेपुर वापर होण्याबरोबरच वर्षभरात किमान तीन पिके शेतक-यांनी घ्यावीत. यासाठी कृषि विभागाने प्रयत्नशील रहावे, असे यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सौर उर्जेवर कृषि पंप जोडण्या देण्यासाठी महावितरण कंपनीने तीनशे शेतकरी होतील यासाठी प्रयत्न करावेत, कृषि विभागाने पंधरा दिवसात शेती यांत्रिकीकरण, पाणीसाठा वाढविण्याबाबत सविस्तर आराखडा घ्यावा. खरीप भात शेतीच्या प्रमाणात रब्बी हंगामात केवळ ५ टक्के भात शेती होते. हे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. उन्हाळी भात शेतीचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषि विभागाने सर्वेक्षण करावे. आदी सूचना यावेळी केल्या.खरीपसाठी ६७ हजार ७५० हेक्टर लक्षांकयंदाच्या खरीप हंगामासाठी ६७ हजार ७५० हेक्टर क्षेत्राचा लक्षांक निधार्रीत केला आहे. यामध्ये भात ६३ हजार हेक्टर, नागली २ हजार हेक्टर, इतर तृणधान्ये २०० हेक्टर, कडधान्ये २ हजार हेक्टर तर तेलबिया ५५० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यातील बियाणे विक्रेते १८१ आहेत. खत विक्रेते २४८ यापैकी सहकारी २४८ यापैकी सहकारी संघ व सोसायट्या ११८ आहेत. किटक नाशके विक्रेते १३७ आहेत. खरीप हंगाम २०१७ साठी २२ हजार १७५ मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. तर ७ हजार ५३१ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. सुधारीत व संकलित भात बियाणे यंदाच्?या हंगामात ७ हजार ५३१ क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन केले आहे. रासायनिक २२ हजार १७५ मेट्रीक टनाची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. ४३४६ शेतक-यांना आंबा नुकसान भरपाई वितरणजिल्ह्यातील ४ हजार ३४६ आंबा उत्पादक शेतकरी तर ११७ काजू उत्पादक शेतक-यांना अनुक्रमे १३५८.११ लक्ष व ९.४० लक्ष नुकसान भरपाई वितरीत केली आहे. हवामानावर आधारीत पथदर्षी फळ पिक विमा योजना अंतर्गत २०१६-१७ मध्ये आंबा ५७११ शेतकरी, काजू १२८ तर केळी ११ शेतकरी सहभागी झाले आहेत. या अनुषंगाने आंबा २८८ लक्ष, काजू ४२.९६ लक्ष तर केळी ४६ हजार रुपये विमा हप्?ता रक्?कम भरलेली आहे.२१ एप्रिल २०१७ रोजी संपन्न झालेल्या खरीप सन २०१६-१७ जिल्हास्तरीय आढावा सभेतील उपस्थित मुद्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली असल्याची माहिती या सभेत देण्यात आली. यामध्ये श्री पध्दतीने भात लागवडीची ८८० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके गत खरीप हंगामात घेण्यात आली तसेच चतुसुत्री ८०० हेक्?टर व सगुणा भात उत्पादन तंत्रज्ञान ८० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. कृषि अभियांत्रिकीकरण उपअभियान योजने अंतर्गत ३३१.८८ लक्ष रुपये निधी खर्च झाला. उन्हाळी हंगामात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी एन. बी. २१ या गवताच्या वाणाचे ३ हजार ठोबांचे वाटप केले आहे. हिरव्या चा-यासाठी शंभर टक्के अनुदानावर ६१ हजार ५६० किलो बियाणाचे वितरण करण्यात आले. अनामत रक्कम भरलेल्?या १हजार ८७८ कृषि पंपापैकी ८७१ कृषि पंपाना विज जोडणीचे काम पूर्ण केले. जिल्हा स्तरापासून विविध विकास कार्यकारी सेवा सोसायट्यांपर्यंत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार २ हजार ८०० ऐवढे नविन सभासद होऊन त्यांनी ९८३.२० लक्ष रुपयांच्या कजार्ची उचल केली आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षाकरीता जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आलेली आहे. ३७४ कामांसाठी १६४६.६९ लाखाचा आराखडा तयार केला असून मार्च २०१७ अखेर ३८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ३१६.५१ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत.प्रारंभी अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव शेळके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सन २०१६-१७ मध्ये उत्कृष्ठ कार्य करणा-या कृषि कर्मचा-यांचा यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बाबली सहदेव गाड, अशोक पारकर, सुधाकर कारवडे, विवेकानंद नाईक व दिगंबर राणे यांचा सत्कार करण्यात आला.