सावंतवाडी : दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले. सर्वत्रच भातपीक जमीनदोस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षी सुरूवातीला पडलेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला होता. सगळीकडे शेती हिरवीगार दिसत होती. मात्र, दोन दिवसांपासून सुरु झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.
चांगले पीक मिळणार या आशेवर शेतकरी आनंदीत होता. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे वातावरण दिसत आहे. मळेवाड तसेच आजूबाजूच्या गावातील शेतीत बागायतीत पाणी घुसून नुकसान झाले. तर काहींच्या घराला पाण्याने वेढा घातलेलां दिसून येत होता.सर्वत्रच भातशेती आडवी झालेली झालेली दिसून येत होती. असाच जर पाऊस पडत राहिला तर तोंडाशी आलेला घास हा या पावसामुळे हिरावून जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच नुकसानभरपाईची मागणी होत आहे.