Narayan Rane: 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 11:55 AM2021-08-29T11:55:17+5:302021-08-29T11:55:46+5:30

Narayan Rane: केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.

Ajit Pawar is ignorant he is just clever in avoiding inquiries says narayan Rane | Narayan Rane: 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Narayan Rane: 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Next

Narayan Rane: केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राणेंनी अजित पवार अज्ञानी असल्याचा घणाघात केला आहे. 'अजित पवार अज्ञानी असून त्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष द्यावं, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही', असं नारायण राणे म्हणाले. 

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल

जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे आज कणकवलीत आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांना केंद्रातलं काही कळत नाही. त्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावं. ते फक्त आपल्यामागे लागलेल्या चौकशा आणि आरोप टाळण्यात हुशार आहेत", असं नारायण राणे म्हणाले.  

राज्यात नव्या उद्योजकांना प्रेरणा देणार
राज्यात लघू उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी युवा उद्योजकांकडून अर्ज मागवून त्यांची छाननी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर सुयोग्य आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना माझ्या खात्यामार्फत प्रोत्साहन, मार्गदर्शन दिलं जाईल, असं नारायण राणे म्हणाले. 

संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोला
तुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. "एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय", असं नारायण राणे म्हणाले. 

जनआशीर्वाद यात्रेत 'मांजर' आडवी गेली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचं पालन करत आम्ही जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. काही ठिकाणी लोक सहा-सात तास उभं राहून यात्रेला प्रतिसाद देतायत. पण यात्रेत काही अपशकून देखील झाले. 'मांजर' आडवी गेली. पण मी काही त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. यात्रा आजही मोठ्या उत्साहात आणि प्रचंड प्रतिसादात सुरू आहे, असं राणे म्हणाले. 

Web Title: Ajit Pawar is ignorant he is just clever in avoiding inquiries says narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.